राजकीय नेतृत्त्व संपवण्यासाठी केंद्रीय तपासयंत्रणांचा वापर… , सामनातुन साधला मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा

राजकीय नेतृत्त्व संपवण्यासाठी केंद्रीय तपासयंत्रणांचा वापर… , सामनातुन साधला मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा

हिंदुरुदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने सोमवारी संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम राबवण्यात आले होते. मुख्य म्हणजे या शुभमुहूर्तावर एकीकडे विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्याचा कार्यक्रम पार पडला. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी या दोन पक्षांमध्ये युती झाली. तर आज शिवसेनेच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातीळ अग्रलेखात आंबेडकर- ठाकरे युतीसंदर्भात लिहिण्यात आले आहे. तसेच राज्यसरकार सहा केंद्रसरकारला देखील टोला लागवण्यात आला आहे. सामनाच्या अग्रलेखात लिहिण्यात आले आहे की “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की, संक्रमणाच्या काळात राजकीय नेतृत्व घडत असतं. त्यामुळे महाराष्ट्र अथवा बाहेरील प्रादेशिक पक्ष स्वतःचं नेतृत्व व संघटन उभं करणार असतील तर त्यांना आम्ही मदत करणार आहोत. विवेक, नीतिमत्तेच्या बळावर राजकारण करण्याचा उद्धव ठाकरेंसह प्रयत्न करू, असे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. महाराष्ट्रात नैतिकतेचे अधःपतन व स्वाभिमानाचा ऱ्हास सुरू असताना ‘आंबेडकर-ठाकरे’ या शक्तीचा उदय व्हावा हा शुभ संकेत आहे. शिवशक्ती व भीमशक्ती हीच महाराष्ट्रासह देशाची महाशक्ती ठरो!”असे सामनाच्या अग्रलेखात लिहिण्यात आले.

तसेच” प्रत्येक नेतृत्त्वाचा कधी ना कधी अंत होतो. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाचाही अंत होईल. पण मोदींनी स्वत:च्याच पक्षातील नेतृत्त्व संपवले आहे, प्रत्येक नेतृत्त्वाचा कधी ना कधी अंत होतो. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाचाही अंत होईल. पण मोदींनी स्वत:च्याच पक्षातील नेतृत्त्व संपवले आहे. इतर कोणत्याही नेत्याला ते उभारी घेऊन देत नाही. मंत्र्यांना कोणतेही अधिकार नाहीत, या प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याकडे ‘सामना’तून लक्ष वेधण्यात आले आहे.” सामनातून प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्यावर लक्षवेधून घेतले आहे.

हे ही वाचा:

राशी भविष्य,२४ जानेवारी २०२३, कौटुंबिक वातावरण मनासारखे राहील

शरीर फिट आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी आहारात सॅलेडचा समावेश करा आवर्जून

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version