spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Vaibhav Naik : ‘मला अटक केली तरी भाजप, राणेंसमोर झुकणार नाही’ ; वैभव नाईकांचे सडेतोड उत्तर

तळकोकणात भर दिवाळीत राजकीय वातावरण तापले असल्याचे दिसत आहे. वैभव नाईक विरुद्ध राणे यांच्यातील वाद वाढू लागला आहे. आता, वैभव नाईक यांनी निलेश राणेंनी लोकशाहीच्या मार्गाने निवडणुकीत उभं राहून दाखवावे असं खुलं आव्हान दिलं आहे. नारायण राणेंना २०१४ ला पराभव केला आता निलेश राणेंनादेखील पराभूत करू असेही नाईक यांनी म्हटले. आपण उद्धव ठाकरे यांची साथ सोडून जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आमदार वैभव नाईक म्हणाले, माझ्यावर एसीबीची कारवाई व्हावी यासाठी राणेच प्रयत्न करीत असल्याचे हे आता सिद्ध झाले. राणेंच्या दबावाला आम्ही यापूर्वी भीक घातली नाही आणि यापुढेही घालणार नाही. या देशात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्याचे नाईक यांनी म्हटलं.

हेही वाचा : 

युक्रेनवर ३६ रॉकेटने हल्ला, १५ लाख लोकांच्या घरात अंधार तर, झेलेन्स्की म्हणाले, रशियाला जाणीवपूर्वक…

भाजपच्या नेत्यानी वैभव नाईक यांना अटक करा अशी मागणी केली आहे. याच गोष्टीला आमचा विरोध आहे. तुम्ही दबाव आणणार आणि तुमच्या दबावाला भीक घालून आम्ही तुमच्या पक्षात येणार असा समज असेल तर तो चुकीचा आहे. आम्ही कोणाच्या दबावाला झुकणार नाही, असं ठाम मत आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केले.

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी म्हटले की, भाजपने संविधान समर्थन रॅली काढून संविधानाच्या विरोधात भूमिका घेतली. भाजप सोबत येत नाहीत त्याना जेलमध्ये टाकू असं भाषणात म्हणत होते. भाजपच्या संविधान समर्थन रॅलीत जे होते ते भाजपची सत्ता आल्यानंतर गेले होते. मला भाजपमध्ये येण्यासाठी दवाब तंत्र वापरत असलात तर मी त्याला भीक घालणार नाही. मी चौकशीला सामोरे जाईन. माझ्याकडे एक रुपया जरी बेहिशेबी आढळला तर मला फाशी द्या असं जाहीर आव्हान देतोय असे नाईक यांनी म्हटले. भास्कर जाधव आणि मी चुकीचे वागलो असल्यास अटक करा. आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिलो म्हणून कारवाई करत असली तरी शिवसेनेसोबत राहणार असल्याचे नाईक यांनी म्हटले.

Shivsena Uddhav Balasaheb Thackeray : ठाकरे गटातून ‘या’ दिग्गज नेत्याची हकालपट्टी

निलेश राणे आणि नारायण राणे यांनी दबावाखाली येऊन किती पक्ष बदलले. आम्ही मात्र कुणाचे मिंदे नसल्याने लोकांसमोर ठामपणे जात आहोत. कालच्या व्यासपीठावर असलेले लोक ही लोकांमधून निवडून आलेले नाहीत त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही असेही नाईक यांनी म्हटले.

Latest Posts

Don't Miss