Saturday, July 6, 2024

Latest Posts

मनुस्मृतीचा उघडपणे पुरस्कार करणाऱ्या BJP पेक्षा Congress वेगळी नाही, Nana Patole यांच्या ‘त्या’ कृत्यावर VBA ने मांडली भूमिका

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेण्याच्या कृत्यावर आता चोहोबाजूंनी टीका करण्यात येत आहे. अश्यातच, आता वंचित बहुजन आघाडीनेही (Vanchit Bahujan Aghadi) यावर आपली प्रतिक्रिया दिली असून वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर (Rekha Thakur) यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेण्याच्या कृत्यावर आता चोहोबाजूंनी टीका करण्यात येत आहे. सदर व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत असून राज्यातील इतर राजकीय नेत्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत. अश्यातच, आता वंचित बहुजन आघाडीनेही (Vanchit Bahujan Aghadi) यावर आपली प्रतिक्रिया दिली असून वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर (Rekha Thakur) यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे. नाना पटोले यांच्यावर टीका करत, “नाना पटोलेंची कृती ही काँग्रेसमधील (Congress) उच्च निचतेच्या सरंजामी संस्कृतीला शोभणारे प्रच्छन्न प्रदर्शन आहे,” असे वक्तव्य केले आहे.

वंचित बहुजन आघाडी च्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून पोस्ट करत याची माहिती देण्यात आली. पोस्टमध्ये म्हंटले गेले कि, “महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी अकोला येथील कार्यकर्त्याच्या हातून पाय धुवून घेतल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. खरंतर ह्या घटनेबद्दल वंचित बहुजन आघाडीला आश्चर्य वाटत नाही. नाना पटोलेंची कृती ही काँग्रेसमधील उच्च निचतेच्या सरंजामी संस्कृतीला शोभणारे प्रच्छन्न प्रदर्शन आहे कारण, यांचा समतेवर विश्वास नाही. पटोले हे आपल्याच पक्षाच्या सर्व सामान्य कार्यकर्त्याला स्वतःचा गुलाम मानतात व म्हणूनच त्यांनी स्वतःचे घाणेरडे पाय हे कार्यकर्त्याला धुवायला लावले.”

पोस्ट मध्ये पुढे लिहिण्यात आले कि, “नाना पटोलेंना वर्चस्ववादी वर्तनाबद्दल जेव्हा-जेव्हा छेडले जाते, तेव्हा मी शेतकऱ्याचा पुत्र आहे अशी बतावणी ते करतात परंत, वारंवार ज्या आक्षेपार्ह घटना समोर येतात त्यातून हेच सिद्ध होते की, मनुस्मृतीतली विषमता यांच्या मनात घट्ट रुजलेली आहे. मनुस्मृतीचा उघड-उघड पुरस्कार करणाऱ्या भाजपपेक्षा (BJP) हे काही वेगळे नाहीत. सर्व वंचित घटक हे यांची गुलामी करण्यासाठी आणि हे स्वतः मात्र सत्ता गाजवण्यासाठीच आहेत. ह्या मनुस्मृतीच्या मूल्यांवर यांचा दृढ विश्वास आहे. म्हणून कार्यकर्त्यांनी तरी नेत्यांचे अंधानुकरण व लाचारी सोडून दिली पाहिजे व नेत्यांच्या सरंजामी संस्कृती विरोधात संविधानाने दिलेल्या स्वाभिमानी समतेच्या मूल्यांवर आचरण करत आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवला पाहिजे.”

हे ही वाचा

BJP च्या चाणक्याला धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही, Rohit Pawar यांचे Devendra Fadnavis यांना खडेबोल

Kokan Graduate Constituency: पैशाच्या जोरावर विकत घेऊ पाहणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा: Nana Patole

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss