‘एकनाथ शिंदे अडचणीत आलेत’ ; वंचित बहुजन आघाडीच्या नेत्याचे वक्तव्य

‘एकनाथ शिंदे अडचणीत आलेत’ ; वंचित बहुजन आघाडीच्या नेत्याचे वक्तव्य

राज्यातून एकानंतर एक महत्वाचे प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत. यामुळे देवेंद्र फडणवीस यांची फार अडचण होणार नाही. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना तोंड द्यावं लागणार आहे. ते जिथे जिथे जातील तिथे तिथे त्यांना याचं उत्तर द्यावं लागणार आहे. पहिला प्रकल्प गेला तेव्हा आम्ही जबाबदार नव्हतो, असे ते म्हणाले. मात्र आता सरकारच्या हातून दोन प्रकल्प गेले आहेत. याचं उत्तर द्यावं लागणार आहे, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. आंबेडकर म्हणाले, वेदांता प्रकल्पानंतर दोन प्रकल्प तर राज्याच्या हातून गेले. आता तिसराही पेट्रो केमिकल्सचा प्रकल्प कर्नाटकात जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे असे प्रकल्प बाहेर जाताना, एकनाथ शिंदे अडचणीत आहे, असे मी मानतो, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलंय.

हेही वाचा : 

विराट कोहलीच्या हॉटेल रूमचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हॉटेलची कारवाई

‘महाराष्ट्रातील दीड लाख तरुणांचा रोजगार गेला’ ; प्रकाश आंबेडकर

गुजरातमध्ये हिसकावून नेण्यात आलेल्या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील दीड लाख तरुणांचा रोजगार गेला आहे. टाटा एयरबस प्रकल्पामुळे ६ हजार रोजगार उपलब्ध होणार होते. तर वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्पामुळे १ लाख नोकऱ्यांची निर्मिती झाली असती. तसेच बल्क ड्रग पार्क प्रकल्पांसाठी विचाराधीन असलेलं महत्त्वाचं राज्य होतं. यामधून ५० हजार लोकांना रोजगार मिळाला असता. पण १ सप्टेंबर रोजी केंद्र सरकारने यासाठी हिमाचल प्रदेश, गुजरात आणि आंध्र प्रदेशला मान्यता दिली. महाराष्ट्राला यामधून वगळण्यात आले. अशाच प्रकारे औरंगाबादमधील ऑरिक सिटीमध्ये होणारा मेडिकल डिव्हाइसेस पार्कला देखील केंद्र सरकारने मान्यता दिली नाही. हा प्रकल्प तामिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्ये हलवण्यात आला आहे. या प्रकल्पातून ३ हजार रोजगार निर्मिती होणार होती.

Devendra Fadnavis : “माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहाटीला गेले”, फडणवीसांचा गौप्यस्फोट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, मोदी केवळ गुजरातचे पंतप्रधान आहे, असं वाटतं. ते सगळे प्रकल्प गुजरातला घेऊन जात आहेत, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं. दक्षिणेकडील राज्यांवर हिंदी लादणे गैर असून आता कुठे या राज्यांमध्ये हिंदीला स्थान मिळू लागले होते मात्र आता या राज्यांवर आर्थिक व भाषिक संकट कोसळले असून त्यासाठी मोदी जबाबदार असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Exit mobile version