Wednesday, October 2, 2024

Latest Posts

Varsha Gaikwad: राज ठाकरेंनंतर वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीमुळे चर्चांना उधाण…

भेटीच्यावेळी, आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री तानाजी सावंत आणि महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा देखील उपस्थित होते.

राजकीय नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरेंनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची आज भेट घेतली आहे. त्यांच्या भेटीनंतर माजी शालेय मंत्री आणि

काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाडांनीसुद्धा एकनाथ शिंदेंनी भेट घेतली आहे. एकनाथ शिंदे आणि वर्धा गायकवाड यांच्या या अचानक भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

राज ठाकरे यांनी आरोग्यविषयक काही प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. तर वर्षा गायकवाड यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली, यांचं कारण कारण अजून स्पष्ट झालेलं नाही, तरीही शिक्षणविषयक काही प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ही भेट झाली असल्याची शक्यता वर्तवली जातेय, दरम्यान एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीवेळी, आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री तानाजी सावंत आणि महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा देखील उपस्थित होते.

आज राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात दुपारी दीड वाजताच्या सुमारास भेट झाली होती. ही भेट वर्षा बंगल्यावर झाली असून त्याच्यात सुमारे एक तास चर्चा झाली. जरी ही भेट आरोग्यविषयक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी झाली असली तरी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या आजच्या भेटीनंतर अंधेरी पोटनिडणुकीत मनसे शिंदेगटाला पाठिंबा देते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हे ही वाचा:

‘आमच्या ३ बायका आहेत पण हिंदू…’, AIMIM नेते शौकत अली यांचे विधान व्हायरल

Amit Thackeray: आणखी एका ठाकरेंची निवडणुकीच्या रिंगणात एन्ट्री, निवडणूक लढवण्याचे दिले संकेत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss