spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

फक्त माफीने भागणार नाही, मोदीजी तुमच्या सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे… Varsha Gaikwad यांची प्रतिक्रिया

सिंदुधुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी माफीदेखील मागितली. आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर त्यांची पहिली प्रतिक्रिया ही दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज (शुक्रवार, ३० सप्टेंबर) महाराष्ट्राच्या भेटीदरम्यान पालघरमधील वाधवन बंदराची पायाभरणी केली. यादरम्यान सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पडझड झाल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी माफी मागितली आहे. परंतु, आता काँग्रेस खासदार वर्ष गायकवाड (varsha Gaikwad) यांनी यावरून पंतप्रधान मोदींवर जोरदार आगपाखड केली आहे.

काय म्हणाल्या वर्षा गायकवाड?

वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात आज काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कोसळलेल्या पुतळ्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माफी मागण्याची मागणी करण्यात आली होती. आता आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून याबाबत भाष्य करत त्या म्हणाल्या, “दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा..! आज पुन्हा दिल्लीला महाराजांपुढे, महाराष्ट्रापुढे, महाराष्ट्रवासियांच्या अस्मितेपुढे झुकावंच लागलं. प्रधानमंत्री महोदयांना महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेची माफी मागावीच लागली. पण फक्त माफीने भागणार नाही. मोदीजी, तुमच्या सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे आणि निष्काळजीपणामुळे महाराष्ट्राचा स्वाभिमान जमीनदोस्त झाला आहे. तुमचे सरकारे आमच्या महापुरुषांचे कायमच अपमान करत आले आहे. आपल्या राजकीय स्वार्थासाठी ED-CBI-IT या यंत्रणांचा सर्रास वापर विरोधकांना संपवण्यासाठी करत आले आहे. आता या महा भ्रष्टाचाराप्रकरणी तुम्ही नक्की काय कारवाई करणार आहात, हे महाराष्ट्राच्या जनतेला आणि सर्व शिवप्रेमींना सांगा.”

त्या पुढे म्हणाल्या, “आणि फक्त कंत्राटदारावर कारवाई करून चालणार नाही, महाराजांचा अपमान करण्याऱ्या तसेच महाराष्ट्रवासियांच्या स्वाभिमानाच्या चिंधड्या उडवणाऱ्या सर्व गद्दारांना कठोर शासन झालं पाहिजे, ही महाराष्ट्राची मागणी आहे. जय भवानी, जय शिवाजी”

पंतप्रधान मोदींनी मागितली माफी

पंतप्रधान मोदी म्हणाले, “जेव्हा २०१३ मध्ये भाजपने मला पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून निश्चित केले होते, तेव्हा मी रायगड किल्ल्यावर जाऊन प्रार्थना केली होती. एक भक्त ज्या भावनेने आपल्या देवतेची पूजा करतो, त्याच भावनेने मला देशाची सेवा करायची आहे.” यावेळी पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांची माफीही मागितली. ते म्हणाले, “सिंधुदुर्गात नुकतेच जे काही घडले, ते माझ्यासाठी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक नाव नाही, ते फक्त एक राजा, महाराज नाहीत, आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे पूजनीय दैवत आहेत. आज मी नमन करतो. माझे मस्तक आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा.” मी तुमच्या चरणी डोके ठेवून माफी मागतो.”

पालघरमध्ये जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी सावरकरांचाही उल्लेख केला. ते म्हणाले, “आमची मूल्ये वेगळी आहेत. भारतमातेचे शूर सुपुत्र वीर सावरकर यांना शिवीगाळ करणारे आणि देशभक्तांच्या भावना चिरडणारे आम्ही नाही. वीर सावरकरांना शिवीगाळ करूनही आम्ही माफी मागायला तयार नाही. महाराष्ट्राचा आहे. अशी मूल्ये जनतेला कळावीत, मी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागण्याचे काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “एक काळ असा होता जेव्हा भारताची गणना जगातील सर्वात समृद्ध आणि शक्तिशाली राष्ट्रांमध्ये केली जात होती. भारताच्या या समृद्धीचा एक मोठा आधार होता भारताची सागरी शक्ती… आपली ही शक्ती महाराष्ट्रापेक्षा चांगली होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाच्या प्रगतीसाठी काय निर्णय घेतले होते, हे कोणाला माहीत असेल.”

हे ही वाचा:

Rajkot Fort: Jaydeep Apte गायब की फरार? शिवप्रेमींचा सवाल, पोलिसांना जर त्याला पकडायचेच होते तर…

माफी मागितली, पण उघडकीस आलेला भ्रष्टाचार मान्य केला नाही, Jitendra Awhad यांची PM Narendra Modi यांच्यावर टीका

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss