Sunday, July 7, 2024

Latest Posts

Mumbai North Central Constituency मधून विजयानंतर Varsha Gaikwad यांनी Uddhav Thackeray यांना दिली भेट

अटीतटीच्या या लढतीत शेवटी वर्षा गायकवाड यांनी विजय मिळवला. त्यानंतर, आज त्या शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या "मातोश्री" निवासस्थानी भेट दिली.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर (Loksabha Election 2024) देशभरात एनडीए आघाडी (N DA Alliance)आणि इंडिया आघाडीच्या (INDIA Alliance) कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. एनडीए ला बहुमत प्राप्त झाले असले तरीही इंडिया आघाडीनेही चमकदार कामगिरी करत २४० जागा जिंकल्या आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) सर्वाधिक जागा मिळवल्या असून महायुतीला (Mahayuti) मात्र अपेक्षित यश प्राप्त झाले नाही. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात (Mumbai North Central Constituency) काँग्रेसच्या (Congress) वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) आणि भाजपचे (BJP) उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांच्यात चुरशीची लढत झाली. अटीतटीच्या या लढतीत शेवटी वर्षा गायकवाड यांनी विजय मिळवला. त्यानंतर, आज त्या शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या “मातोश्री” निवासस्थानी भेट दिली.

आपल्या अधिकृत “X” अकाऊंटवरून पोस्ट करत त्या यावेळी म्हणाल्या, “हातात धगधगती मशाल साथीला तुतारी, लोकशाहीचा विजय झाला सुरू जनसत्तेची तयारी..! महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास जिंकत इंडिया महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला. या विजयात सिंहाचा वाटा उचलणारे शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांची आज मातोश्रीवर सदिच्छा भेट घेतली, त्यांचे मनापासून अभिनंदन केले. यावेळी माजी मंत्री ॲड. अनिल परब, डॉ. महेश पेडणेकर, संदीप नाईक आणि विजू शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.”

“आपल्या या बहिणीला खासदार बनवून दिल्ली पाठवणारंच हा त्यांनी दिलेला शब्द माझ्या प्रचार मोहिमांदरम्यान अतिशय ऊर्जादायी ठरला. अन्यायाविरुद्ध न्यायाच्या या रणसंग्रामात विजयश्री खेचून आणण्यासाठी निष्ठावंत शिवसैनिकांनी अथक परिश्रम घेतले. याबद्दल मी साहेबांचे आणि शिवसैनिकांचे जेवढे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. मात्र मी सर्वांची कायम कृतज्ञ राहीन.”

यावेळी माध्यमांशी संवाद साधत त्या म्हणाल्या, “आम्ही उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आलो होतो. महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये महाविकास आघाडीला चांगल यश मिळालं आहे. उद्धव ठाकरेंनी सगळ्या ठिकाणी सभा घेतल्या होत्या, दौरे केले होते, त्यांनी जे जनतेला आवाहन केले होते त्याप्रती त्यांना आज आम्ही भेटायला आलो. त्यांनी सांगितलं होते कि उत्तर मध्य मुंबईतुन वर्षा गायकवाड यांना उमेदवारी द्या, तेथुन माझ्या यशाला सुरुवात झाली. महाराष्ट्रात, मुंबई महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एक दिलाने एक मताने काम केलं त्यांचा परिणाम आम्हाला घवघवीत यश मिळालं. शिवसेना, राष्ट्रवादी, शेकाप, समाजवादी पार्टी असेल सगळ्यांनी आम्हाला मदत केली. आनंद या गोष्टीचा आहे मुंबईत 5 जागा आम्ही जिंकलो. मुंबई काँग्रेसची अध्यक्ष म्हणुन मी आज उद्धव ठाकरे यांना भेटायला आले आहे. येणाऱ्या काळामध्ये काम करताना त्याचं मार्गदर्शन आम्हाला प्रेरणादायी आहे. येणाऱ्या विधानसभेची सुद्धा आम्ही चांगली तयारी करणार आहोत. लोकांमध्ये आता विश्वास निर्माण झाला आहे महाविकास आघाडी एकत्र काम करु शकते. एकत्र लढल्यामुळे आमचा विजय झाला.”

महाराष्ट्रात महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवले असून ३० जागा आपल्या नावे केल्या आहेत. तर दुसरीकडे महायुतीला १७ जागांवरच विजय मिळवता आला आहे. महाराष्ट्रात काँग्रेस (Congress) हा सर्वाधिक मोठा पक्ष ठरला असून काँग्रेसने १३ जागा जिंकल्या आहेत. शिवसेना उबाठा गटाला (Shivsena UBT) ९ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला (NCP Sharad Pawar) ८ जागा जिंकता आल्या आहेत. महायुतीत भाजपला (BJP) ९ जागा मिळाल्या असून शिवसेना शिंदे गटाला (Shivsena) ७ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला (NCP) केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

हे ही वाचा:

चहावाला पंतप्रधान, रिक्षावाला मुख्यमंत्री तर कार्यकर्ता खासदार, ठाण्यात Naresh Mhaske यांच्या विजयानंतर बॅनर्सची धूम

‘गड आला पण सिंह गेला,’ Rajan Vichare यांच्या पराभवानंतर ठाण्यात बॅनरने वेधले लोकांचे लक्ष

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss