spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

वर्षा राऊत ईडी कार्यालयात दाखल, अनोळखी व्यक्तीशी व्यवहार केल्या प्रकरणी आरोप

मुंबई : पत्राचाळ आर्थिक घोटाळया प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सध्या ईडी कोठडीत आहे. न्यायालयाने संजय राऊत यांना 8 ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आता संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावला आहे. त्यानंतर वर्षा राऊत आज चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत. आता त्यांच्यावर कारवाई होणार का सुटका होणार याकडे राज्यचे लक्ष लागलेले आहे.

अनोळखी व्यक्तीशी व्यवहार केल्या प्रकरणी आरोप

पत्राचाळ प्रकरणात आर्थिक लाभ झाल्याचा आरोप ईडीकडून करण्यात येत होता. विविध अकाउंटवरून वर्षा राऊत यांच्या अकाउंटवर एक कोटीपेक्षा जास्त पैसे आल्याचा आरोप केला जात आहे. त्याचबरोबर अलिबागमधील जमीन व्यवहारात त्यांचा आणि स्वप्ना पाटकरांचा सामावेश होता. या प्रकरणात त्यांची चौकशी करण्यात येत असून याआधीही त्यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती.

ईडी वकिलांचा युक्तिवाद

ईडीच्या वकिलांनी गुरुवारी न्यायालयात वर्षा राऊत यांचा आर्थिक गैरव्यवहारात सहभाग असल्यासंदर्भात भाष्य केले होते. ईडीने राऊत यांच्या घरावर छापे टाकले तेव्हा काही कागदपत्रे सापडली होती. त्यानंतर संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यातून काही व्यक्तींना रक्कम पाठवली गेली असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता आज ईडीने वर्षा राऊत यांना समन्स पाठवले आहे.

आने दो, आने दो सबको आने दो… संजय राऊत म्हणाले

संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर 8 ऑगस्टपर्यंत कोठडी देण्यात आली आहे. आज त्यांना ईडी कार्यालयात मोठ्या पोलीस बंदोबस्तात आणण्यात आले. संजय राऊत यांना न्यायालयात हजर करण्यापूर्वी जे जे रुग्णालयात घेऊन जात असताना. माध्यमांनी वर्षा राऊत यांना आलेल्या समन्ससंदर्भात विचारण्यात आले असता. राऊत म्हणाले, “आने दो, आने दो सबको आने दो”, असे म्हणाले. त्यानंतर संजय राऊत हे ईडी कार्यालयात गेले.

हेही वाचा : 

राज्याचे अधिकार सचिवांकडे : मुख्यमंत्र्यांचे आदेश

Latest Posts

Don't Miss