Sheetal Mhatre Viral Video, शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणी वरून सरदेसाई यांचा नवा खुलासा

शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आतापर्यंत पाच जणांवर कारवाई करण्यात आली आहे. व्हायरल व्हिडीओ प्रकरणात आता युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी देखील उडी मारली आहे.

Sheetal Mhatre Viral Video, शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणी वरून सरदेसाई यांचा नवा खुलासा

शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आतापर्यंत पाच जणांवर कारवाई करण्यात आली आहे. व्हायरल व्हिडीओ प्रकरणात आता युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी देखील उडी मारली आहे. या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी वरून सरदेसाई यांनी मोठा दावा केला आहे. प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव राज सुर्वे यांनी तो संपूर्ण व्हिडिओ फेसबुक लाईव्ह केला होता. त्यामुळे खरा आरोपी आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे असून या प्रकरणी राज सुर्वेंना यांना अटक केली पाहिजे, अशी मागणी वरून सरदेसाई यांनी केली आहे. शीतल म्हात्रेंचा व्हिडीओ मॉर्फ केलेला असेल तर खरा व्हिडीओ कुठे आहे असा सवाल ही सरदेसाई यांनी केला आहे.

मुंबई पोलीस सक्षम आहेत, ते खऱ्या आरोपीला अटक करतीलच. हा व्हिडीओ आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलानेच बनवला असल्याचं वरून सरदेसाई यांनी सांगितलं आहे. “जे नेते आणि कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम आहेत. त्यांच्यावर रोज कारवाया केल्या जात आहेत. सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून फक्त विरोधी पक्षाच्या नेत्यांवर कारवाया होत आहेत. मात्र ते नेते भाजपमध्ये गेले तर त्यांच्यावरील कारवाया थांबतात. जनता हे सगळं पाहत आहे. जनतेला हे रुचलेलं नाही आणि त्यामुळेच ठिकठिकाणी भाजपचे स्वतःच्या गडामध्येच पराभव होत आहेत” असं म्हणत वरून सरदेसाई यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भूषण देसाई यांचा शिंदे गटात झालेल्याब पक्षप्रवेशाबाबत प्रश्न विचारला असता, आमचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी त्यांचं म्हणणं मांडलेले आहे. त्यामुळे त्याबद्दल मी बोलणे योग्य नसल्याचे वरुण सरदेसाई म्हणाले आहेत.

व्हायरल व्हिडिओच्या संदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील विधान केलं आहे. शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे व प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी संजय राऊतां यांनी केली आहे. हा व्हिडिओ खरा आहे का खोटा याचा तपास लावा, आणि हा व्हिडिओ जर खरा असला तर संबंधितांवर भारतीय कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी राऊतांनी केली आहे.

हे ही वाचा :

Income Tax Saving, तुम्हाला इन्कम टॅक्स वाचवायचा? तर या महिन्यात हे महत्त्वाचे काम नक्की करा

२० हजार आंदोलक शेतकरी मुंबईच्या वेशीवर, तर सभागृहातल्या मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे विरोधी पक्षनेते अजित पवार संतापले

जुन्या पेंशन योजनेसाठी सुरू असलेल्या आंदोलनातून सरकारने तातडीने मार्ग काढावा, अजित पवार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version