Sindhudurg : जिल्हा नियोजन सभेदरम्यान नारायण राणे व विनायक राऊत यांच्यात शाब्दिक खडाजंगी

Sindhudurg : जिल्हा नियोजन सभेदरम्यान नारायण राणे व विनायक राऊत यांच्यात शाब्दिक खडाजंगी

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि खासदार विनायक राऊत यांच्यात आज जिल्हा नियोजन सभेदरम्यान सुरुवातीलाच शाब्दिक बाचाबाची झाली. सभेच्या सुरुवातीलाच जिल्हा नियोजनची सभा कोण चालवतं असा प्रश्न खासदार विनायक राऊत यांनी उपस्थित केला. त्यानंतर नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यात बाचाबाची झाली.

जिल्हा नियोजन समितीची सभा सुरू होताच शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी जिल्हा नियोजनाची सभा कोण चालवतंय असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नियोजन बैठकीत सभेच्या अजेंड्यावर असलेले विषय घेऊन बैठक घ्यावी असं म्हटलं. त्यानंतर या दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर दोघांनीही माध्यमांशी बोलताना एकमेकांवर टीका केली. तर विनायक राऊत माध्यमांशी बोलताना भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देखील केली.

हेही वाचा : 

महाराष्ट्र,कर्नाटक राज्यपालांच्या उपस्थितीत दोन राज्यांच्या समन्वयावर बैठक, पण संवेदनशील सीमावादावर चर्चाच नाहीच

महाविकासआघाडी सरकार कोसळल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात डीपीडीसी सभा प्रदीर्घ काळ रखडली होती. कालांतराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप अशा युतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर आज (४ नोव्हेंबर) ही सभा पार पडली. यात डीपीडीसी बैठकीत मंजूर होऊनही विकासकामांना कोणत्या कारणास्तव स्थगिती दिली? असा सवाल खासदार विनायक राऊत यांनी केला. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सभेची सुरुवात सभेच्या अजेंड्यावरुनच होऊ दे. हा प्रश्न आयत्यावेळी घेतल्या जाणाऱ्या विषयांमधील असल्याचे सांगितले. त्यावरुन विनायक राऊत आक्रमक झाले. हा प्रश्न मी पालकमंत्र्यांना विचारला आहे. तुम्ही पालकमंत्री आहात काय? असा थेटच सवाल विनायक राऊत यांनी नारायण राणे यांना विचारला. त्यानंतरत सभेत वातावरण तापले.

SSC & HSC Exam : दहावी बारावीच्या मुलांना परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढ

‘कोणता विषय कधी घ्यावा हे विनायक राऊत यांना समजत नाही, हे त्यांचे अज्ञान आहे असा टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लगावला. मी असताना विनायक राऊत सुरवात करू शकतात का असा सवाल उपस्थित करत, अजित पवार यांनी थापा मारण्याचे काम मीडिया समोर केले आहे, ते आपण ऐकले आहे, त्यासाठी विशेष पत्रकार परिषद घेऊ.’ असेही नारायण राणे म्हणाले.

Exit mobile version