Thursday, July 4, 2024

Latest Posts

Vidhan Parishad Election 2024: कोण ठरणार मुंबई शिक्षक मतदार संघाचे उमेदवार ?

शिक्षक मतदार संघातील जागेसाठी एकूण पाच उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदार संघात साधरणतः शिक्षकांसाठी निर्मिले जाते. यात शिक्षकांचे प्रश्न मांडले जातात. या निवडणुकीसाठी महविकास आघाडी (Mahavikas Aghadi) व महायुती (Mahayuti) यांच्यात चुरशीची लढत लागली आहे. आता कोण निवडून येईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. 

लोकसभेनंतर (Lok Sabha Election 2024) महाराष्ट्र (Maharashtra News) विधान परिषदेच्या (Vidhan Parishad Election 2024) चार जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. या चार जागांमध्ये दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदार संघाचा समावेश आहे. मुंबई (Mumbai News) आणि कोकण (Konkan News) पदवीधर मतदार संघ, तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघात ही निवडणूक पार पडणार आहे.

या चारही जागांची मुदत ७ जुलै २०२४ रोजी संपणार आहे. त्यात पुढील निवडणूक कार्यक्रमानुसार, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २२ मे आहे तर, मतदानाची तारीख २६ जून आहे. १ जुलैला मतमोजणी होईल. मात्र, या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये उमेदवारीसाठीची रस्सीखेच सुरू आहे. 

मुंबई शिक्षक मतदार संघासाठीचे उमेदवार कोण ?

  1. ज. मो. अभ्यंकर : शिवसेना ठाकरे गट
  2. शिवनाथ दराडे : भाजप 
  3. सुभाष मोरे : शिक्षक भारती  
  4. शिवाजी शेंडगे : शिवसेना शिंदे गट पुरस्कृत उमेदवार
  5. शिवाजी नलावडे : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 

मुंबई शिक्षक मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटानं (UBT) प्रशासनातील अनुभव असलेले अधिकारी ज. मो. अभ्यंकर (J.M. Abhyankar) ज्यांना त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचं (State Council of Educational Research & Training) काम करणारे शिवनाथ दराडे (Shivnath Darade) यांना उमेदवारी दिली आहे. तर कपिल पाटील (Kapil Patil) यांच्या शिक्षक भारतीकडून स्वतः कपिल पाटील यांनी उमेदवारी न घेता  शिक्षक भारतीतील आपले सहकारी सुभाष मोरे (Subhash More) यांना उमेदवारी जाहीर केली असून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. दुसरीकडे  शिवसेना शिंदे गटानं (Shivasena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं (Netional Congress) महायुतीचा धर्म न पाळता शिंदे यांनी शिवाजी शेंडगे (Shivaji Shengade)  यांना पुरस्कृत उमेदवार घोषित केलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार  शिवाजी नलावडे (Shivaji Nalavde) यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही आणि तेसुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या पाच  जणांच्या लढतीमध्ये बाजी कोण मारतं याकडे लक्ष असेल.

मुंबई शिक्षक मतदार संघात एकूण मतदार संख्या किती आहे ?

  1. एकूण १५ हजार ८३९ मतदार आहेत. 
  2. मुंबई शहरी भागांत २ हजार १४ स्त्री, तर ५११ पुरुष मतदार आहेत.
  3. मुंबई उपनगरात ९ हजार ८७२ स्त्री मतदार, तर ३ हजार ४४२ पुरुष असे.

यंदा शिक्षक मतदार संघातील जागेसाठी एकूण पाच उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदार संघात साधरणतः शिक्षकांसाठी निर्मिले जाते. यात शिक्षकांचे प्रश्न मांडले जातात. या निवडणुकीसाठी महविकास आघाडी (Mahavikas Aghadi) व महायुती (Mahayuti) यांच्यात चुरशीची लढत लागली आहे. आता कोण निवडून येईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. 

हे ही वाचा

PUNE HIT-AND-RUN: अपघाताप्रकरणी एकनाथ शिंदे यांनी अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना केले मोठे आवाहन..

JOB VACANCY: BOMBAY HIGH COURT मध्ये आली आहे नवी जॉबची संधी; जाणून घेऊ सविस्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

 

Latest Posts

Don't Miss