Thursday, July 4, 2024

Latest Posts

Vidhan Parishad Election: मुंबई पदवीधर मतदारसंघ कोणाच्या ताब्यात येणार ? ; जाणूयात सविस्तर

विद्यार्थ्यंच्या प्रश्नावर कायमस्वरूपी असे कोणते उत्तर असेल ते नियोजन येथे केले जाते. या निवडणुकीसाठी महविकास आघाडी (Mahavikas Aghadi) व महायुती (Mahayuti) यांच्यात चुरशीची लढत लागली आहे. आता कोण निवडून येईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. त्यामुळे विद्यार्थ्यंच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची अशी विधानपरिषद निवडणूक आहे. 

काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणूक पार पडली. त्यांनतर केंद्रामध्ये सत्तास्थापन झाली. त्यानंतर आता विधान परिषदेची रणधुमाळी सुरु झाली आहे. लोकसभेनंतर (Lok Sabha Election 2024) महाराष्ट्र (Maharashtra News) विधान परिषदेच्या (Vidhan Parishad Election 2024) चार जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. या चार जागांमध्ये दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदार संघाचा समावेश आहे. मुंबई (Mumbai News) आणि कोकण (Konkan News) पदवीधर मतदार संघ, तसेच नाशिक आणि मुंबई पदवीधर मतदार संघात ही निवडणूक पार पडणार आहे.

आता विधान परिषदेचे आमदार अनिल परब यांचा विधान परिषदेतील आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण झाला असून शिवसेना ठाकरे गटाकडून पुन्हा अनिल परब यांनाच मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. या ठिकाणी आधी शिवसेना ठाकरे गटाचे विलास पोतनीस हे आमदार होते. आता अनिल परब यांना भाजपच्या किरण शेलार (Kiran Shelar) यांचं आव्हान असणार आहे. यावेळी पदवीधर मतदार संघाची उमेदवारीसाठी भाजप (BJP) आणि शिवसेनेच्या ठाकरे गटातील (UBT) उमेदवार उभे राहणार आहेत. त्यामुळे येथेसुद्धा आता माविआ (MVA) विरुद्ध महायुती (Mahayuti) ही  चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून म्हणजेच उभाठा गटाकडून अनिल परब (Anil Parab) यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच भाजप कडून किरण शेलार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे ही विधान परिषद शिक्षक तसेच पदवीधर मतदार संघाच्या लढती विशेष पाहावयास मिळणार आहेत. 

मुंबईतील पदवीधर मतदार संघातील एकूण किती मतदार असणार आहेत ?

  • एकूण १ लाख २० हजार ६७३ मतदार आहेत. 
  •  मुंबई पदवीधर मतदारसंघात मुंबई शहर स्त्री मतदार १२ हजार ८७३ 
  • पुरुष मतदार १७ हजार ९६९ 
  • एका तृतीयपंथी उमेदवाराचा समावेश आहे.
  • मुंबई उपनगर स्त्री मतदार ३६ हजार ८३८
  • पुरुष मतदार ५२ हजार ९८७ इतके आहेत.
  • एकूण तृतीयपंथी ५ असणार आहेत. 

यंदा पदवीधर मतदार संघातील जागेसाठी एकूण दोन उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदार संघात साधरणतः विद्यार्थ्यांसाठी निर्मिला जातो. यात विद्यार्थ्यंचे विविध प्रश्न मांडले जातात. विद्यार्थ्यंच्या प्रश्नावर कायमस्वरूपी असे कोणते उत्तर असेल ते नियोजन येथे केले जाते. या निवडणुकीसाठी महविकास आघाडी (Mahavikas Aghadi) व महायुती (Mahayuti) यांच्यात चुरशीची लढत लागली आहे. आता कोण निवडून येईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. त्यामुळे विद्यार्थ्यंच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची अशी विधानपरिषद निवडणूक आहे. 

 

Latest Posts

Don't Miss