spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

रवि राणा याचं मुख्यमंत्रयांविरोधात मोठं वक्तव्य

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसचे भाई जगताप आणि भारतीय जनता पार्टीचे प्रसाद लाड यांच्यात ही लढत पाहायला मिळणार आहे.

सकाळी ९ वाजल्यापासून विधान परिषदेच्या निवडणुकीला सुरूवात झाली आहे. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसचे भाई जगताप आणि भारतीय जनता पार्टीचे प्रसाद लाड यांच्यात ही लढत पाहायला मिळणार आहे. असे असताना अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी खूप मोठे वक्तव्य केले आहे. शिवसेनेचा एक उमेदवार १०० पराभूत होणार असं ते म्हणाले त्यामुळे राजकीय क्षेत्रात आता यावरून अनेक गोष्टींबद्दल चर्चा सुरु झाली आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रवि राणा म्हणाले, “राज्यसभा निवडणुकीत संजय पवारांना जी मतं मिळाली, ती फक्त एकनाथ शिंदे यांच्या मेहनतीमुळे मिळाली आहेत. पण आज एकनाथ शिंदे यांना बाजूला करून शिवसेनेनं ज्याप्रकारे विधान परिषद निवडणुकीची मांडणी केली आहे. ते पाहता शिवसेनेचा एक उमेदवार १०० टक्के पडणार आहे. गेल्या ५६ वर्षात जे घडलं नाही, असा धक्का शिवसेनेला विधान परिषदेत बसणार आहे. तसेच भाजपाचे पाचही उमेदवार निवडून येतील,” असं ते म्हणाले.
विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मी भारतीय जनता पक्षाला मतदान करू नये, म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुंबई आणि अमरावतीचे पोलीस आपल्या घरी पाठवले होते. पण मी घरी नसल्याने पोलीस मला अटक करू शकले नाहीत, असा आरोप राणा यांनी केला.

Latest Posts

Don't Miss