विधान सभेच्या ५ राज्यांच्या निवडणूक जाहीर

मध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, मिझोराम, छत्तीसगड विधानसभा निवडणुकीची अखेर निवडणूक आयोगाने घोषणा केली आहे.

विधान सभेच्या ५ राज्यांच्या निवडणूक जाहीर

मध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, मिझोराम, छत्तीसगड विधानसभा निवडणुकीची अखेर निवडणूक आयोगाने घोषणा केली आहे. या ५ राज्यांच्या निवडणूका २०२३ ला नोव्हेंबर मध्ये होणार आहेत. छत्तीसगड १ टप्प्यात, तसेच मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा राज्यात २ टप्यात निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी आयुक्त राजीव कुमार म्हणाले आहेत ‘ निवणूक आयोगाने या ५ राज्यांचा दौरा केला आहे. सरकारी संस्था, राज्य सरकार यांच्यासोबत बैठक घेण्यात आली. मिझोराम राज्याचा कार्यकाळ २०२३ रोजी संपतोय तसेच बाकीच्या ५ राज्यांचा कार्यकाळ २०२४ मध्ये संपणार आहे. या ५ राज्यांमध्ये विधानसभेसाठी ६७९ जागा आहेत. त्यात १६.१४ कोटीहून जास्त मतदार आहेत. यामध्ये ८. २ कोटी पुरुष तर ७.२ कोटी महिला आहेत. तसेच राज्यामध्ये ६० लाख मतदार आहेत ते पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. १७ ऑक्टोबरपासून मतदान यादी जाहीर होणार आहे. १७ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर या कालावधीत कोणत्याही मतदाराला यादीमध्ये बदल करायचे असेल तर तो करू शकतो. या ५ राज्यांमध्ये १.७७ लाखापेक्षा जास्त पोलिंग बूथ बनवले जातील. मतदान केंद्र दोन किलोमीटर अंतरावर बनवण्यात येणार आहे.

मध्य प्रदेश
एकूण जागा:- २२३
मतदान तारीख:- ७ नोव्हेंबर २०२३

राजस्थान
एकूण जागा:- २००
मतदान तारीख:- २३ नोव्हेंबर २०२३

छत्तीसगड
एकूण जागा:- ९०
मतदान तारीख:-

पहिला टप्पा:- ७ नोव्हेंबर
दुसरा टप्पा:- १७ नोव्हेंबर

तेलंगणा
एकूण जागा:- ११९
मतदान तारीख:- ३० नोव्हेंबर

मिझोराम
एकूण जागा:- ४०
मतदान तारीख:- ७ नोव्हेंबर २०२३

या पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल ३ डिसेंबर २०२३ ला लागणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

हे ही वाचा: 

परळीच्या वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासासाठी आता २८६ कोटी रुपये मिळणार!, धनंजय मुंडेंनी मानले राज्यसरकारचे आभार

देशातील भाजपाचे हुकुमशाही सरकार हाकलून लावणे हेच काँग्रेसचे उदिष्ट, नाना पटोले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version