Raj Thackeray वाघ माणूस, दिल्लीसमोर झुकणार नाही, गुढीपाडवा मेळाव्यापूर्वी Vijay Wadettiwar यांचे व्यक्तव्य

Raj Thackeray वाघ माणूस, दिल्लीसमोर झुकणार नाही, गुढीपाडवा मेळाव्यापूर्वी Vijay Wadettiwar यांचे व्यक्तव्य

xr:d:DAGBcpGy9m8:48,j:2961541079903126940,t:24040911

गुढीपाडव्यानिमित्त आज (मंगळवार, ९ एप्रिल) मनसेचा गुढीपाडवा मेळावा (MNS Gudhipadava Rally) पार पडणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आज काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी राज ठाकरे यांच्याबाबत बोलताना सांगितले, “राज ठाकरे वाघ माणूस आहेत. मात्र त्यांना कोल्हा करायचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होत आहे.” विजय वडेट्टीवार सत्ताधाऱ्यांवर टीका करत म्हणाले, “राज ठाकरे हे दिल्लीच्या सत्तेपुढे कधीच झुकणार नाहीत असे वारंवार सांगत होते. मात्र दिल्लीची वारी त्यांना करावी लागली. यात कुठेतरी त्यांना अडचणीत आणण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून होतंय का अशी शंका महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात येत आहे.”

मनसे प्रमुख राज ठाकरे आज काय बोलणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. यंदा मनसेचा गुढीपाडवा मेळावा आणि लोकसभा निवडणूक असे समीकरण जुळून आल्याने राज ठाकरे आज नेमकी काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल ‘राज ठाकरे महायुतीला पाठिंबा देतील’ असे व्यक्तव्य केल्याने राज ठाकरे यांच्याकडून पुढील भूमिका स्पष्ट होईल, अशी अपेक्षा केली जात आहे.

राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली होती. त्यामुळे, मनसे महायुतीत सामील होणार का? अश्या चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर, राज ठाकरे यांनी अद्याप आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट केली नसल्यामुळे आजच्या गुढीपाडवा मेळाव्यात ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर राज ठाकरेंची आजची सभा महत्वपूर्ण मानली जात आहे. राज ठाकरेंच्या मनसेने २०१४ आणि २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकीत आपले उमेदवार मैदानात उतरवले नव्हते. त्यामुळे, यावेळीही ते लोकसभा निवडणुकीत भाग घेणार कि नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. परंतु, भाजपबरोबर वाढत्या जवळीकीमुळे ते महायुतीत सहभागी होतील अशी चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे, आजच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंची राजकीय भूमिका स्पष्ट होणार आहे.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version