Wednesday, October 2, 2024

Latest Posts

Amit Shah २०२९ मध्ये दिल्लीत पण नसतील, सध्या ते कुबड्या घेऊन सत्तेत आहेत: Vijay Wadettiwar

आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) अनुषंगाने राज्यात आता सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे राज्यभरात ठिकठिकाणी दौरे, सभा, बैठका आणि यात्रा पार पाडल्या जात आहेत. अश्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. काल (मंगळवार, १ ऑकटोबर) अमित शाह यांनी मुंबईत कार्यकर्ता मेळाव्यात ‘२०२९ साली भाजप राज्यात स्वबळावर सत्ता आणेल,’ असे वक्तव्य केले होते. यावरून आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी भाष्य करत अमित शहांसह भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

गृहमंत्री अमित शाह कालपासून मुंबई, नवी मुंबई दौऱ्यावर आहेत. काल मुंबईत झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना “आगामी निवडणुकीत महायुतीचे सरकार सत्तेवर येईल, हे निश्चित असून २०२९ मध्ये भाजपाचे स्वबळावर सरकार आणण्यासाठी जोमाने काम करावे,” असे वक्तव्य केले होते. यावरून विजय वडेट्टीवार यांनी आज (बुधवार, २ ऑकटोबर) माध्यमांशी संवाद साधत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “महाराष्ट्रातील जनता त्यांना वैतागली असून २०२९ मध्ये अमित शाह दिल्लीतपण नसतील, कुबड्या घेऊन ते सत्तेत आले आहेत,” अश्या शब्दांत त्यांनी आगपाखड केली आहे.

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले, “२०२९ मध्ये अमित शहा दिल्लीत पण नसतील, कुबड्या घेऊन सत्तेत आहेत, महाराष्ट्रातील जनता त्यांना वैतागली आहे. घोटाळे करणारे सरकार आहे. महाराष्ट्राला हे सरकार नको आहे. महाराष्ट्र या सरकारने विकला आहे. सत्ता दूरच यांना राज्यात फिरणे मुश्किल होईल. भाजप दुतोंडी साप असून जिकडे भक्ष्य तिकडे जातात, वापर झाला की फेकून देतात<‘ असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “नितीन गडकरी कधी कधी सत्य बोलतात. मध्य प्रदेशात अर्थ खात्याने सांगितलं कि लाडकी बहीण योजना चालू शकत नाही. ती त्यांनी चार महिन्यात बंद केली. महाराष्ट्र मध्ये निवडणुकीच्या तोंडावर योजना आणली इथे पण बंद होईल. महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार ४० टक्के पर्यंत गेला आहे. भाजप लुटारूंची टोळी आहे, लुटा आणि वाटा हीच भाजपची नीती आहे. व्होट जिहाद, लव्ह जिहाद हे बोलल्या शिवाय यांना मतं मिळत नाही,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

‘अमित शहांना स्वप्नदोष झालाय,’ Amit Shah यांच्या वक्तव्यावर Sanjay Raut यांचा टोला

पूरग्रस्त राज्यांना मदतीसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून निधी, महाराष्ट्राला मिळाले ‘इतके’ कोटी रुपये!

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss