मृताच्या टाळूवरील लोणी खाणे हि BJP ची नीती, Nitesh Rane यांच्या मुखात तीच भाषा: Vijay Wadettiwar

मृताच्या टाळूवरील लोणी खाणे हि BJP ची नीती, Nitesh Rane यांच्या मुखात तीच भाषा: Vijay Wadettiwar

भाजप (BJP) नेते नितेश राणे (Nitesh Rane) सातत्याने करत असलेल्या वादग्रस्त विधानांवरून आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य नितेश राणे यांनी करू नये, असे महायुतीतील (Mahayuti) इतर नेत्यांनी सांगितले असले तरीही नितेश राणे हे आपल्या भूमिकांवर ठाम असल्याचे दिसत आहे. अश्यातच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याबाबत मवाळ भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. यावरून एकीकडे विरोधकांनी नितेश राणेंवर चांगलाच हल्लाबोल चढवल्याचे दिसत असतानाच आता काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी नितेश राणे यांच्यासह भाजपवर चांगलीच आगपाखड केली आहे.

विजय वडेट्टीवार यांनी आज (रविवार, २२ सप्टेंबर) याबाबत माध्यमांशी संवाद साधत जोरदार हल्लाबोल केला. भाजपच्या नेत्यांनी जो अजेंडा दिला आहे त्यानुसार नितेश राणे यांचे बोलणे सुरू असून मृताच्या टाळूवरील लोणी खाणे हि भाजपची नीती आहे आणि नितेश राणे यांच्या मुखात तीच भाषा असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

विजय वडेट्टीवार यांचा नितेश राणेंवर हल्लाबोल

नितेश राणेंसह भाजपवर टीका करत विजया वडेट्टीवार म्हणाले, “नितेश राणेंना बोलण्याची मर्यादा नाही, ते अवास्तव बोलत आहेत. भाजपच्या नेत्यांनी जो अजेंडा त्यांना दिला आहे, त्यानुसार त्याचे बोलणे सुरू आहे. निवडणूक हरत आहेत, निवडणूक जिंकू शकत नाहीत म्हणून मतांचा पोलरायझेशन करण्यासाठी धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करून आपली पोळी शेकण्याचा प्रयत्न सुरू आहे. मृताच्या टाळू वरील लोणी खाता येईल अशी भाजपची नीती आहे. तेच त्यांच्या मुखातून नितेश राणे बोलत आहेत.”

ते पुढे म्हणाले, “ज्या नितेश राणेंनी आरएसएसवर काँग्रेसमध्ये असताना टीका केले, हे हाफ चड्डीवाले आरक्षण देऊ शकत नाही, हे जातीवादी आहे असे ते म्हणाले होते. मात्र आता सत्तेच्या खुर्चीवर ते असे वक्तव्य करत असेल आणि दोन धर्मात आग लावण्याचे काम करत असतील तर सरकारने त्याचा बंदोबस्त करावा. शासनाची भूमिका त्यासंदर्भात स्पष्ट होत नाही. याचा अर्थ असा भारतीय जनता पक्षाला या राज्यात दंगली घडवायचा आहेत. हे राज्य अस्थिर करायचा आहे. या राज्यात भांडण लावायची आहेत आणि निष्पाप लोकांचा जीव घ्यायचा आहे. ही भाजपची सत्तेसाठी आलेली नीती आहे,” अश्या शब्दात त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

हे ही वाचा:

लोकशाही आणि लोकशक्तीला घाबरणारे हे डरपोक सरकार, मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकांवरून Sanjay Raut यांचा महायुती सरकारवर निशाणा

पाकिस्तानी चित्रपट होणार भारतात रिलीज; Raj Thackeray यांचा थिएटरमालकांना धमकीवजा इशारा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version