राज्यातील लुटारू आणि भ्रष्टाचारी सरकार घालवण्याची सद्बुद्धी दे; Vijay Wadettiwar यांनी मागितले गणरायाकडे साकडे

राज्यातील लुटारू आणि भ्रष्टाचारी सरकार घालवण्याची सद्बुद्धी दे; Vijay Wadettiwar यांनी मागितले गणरायाकडे साकडे

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गणरायाकडे साकडे घालत राज्यातील लुटारू आणि भ्रष्टाचारी सरकार घालवण्याची सद्बुद्धी दे अशी प्रार्थना करत महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. ‘गणपती बाप्पाचे आगमन महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात आणि मंडळांमध्ये आज होत आहे. असे असतानाच महाराष्ट्रावर अरिष्ट आले आहे. बेरोजगारी, महिला अत्याचार, गुन्हेगारी या सर्व गोष्टी दूर कर आणि महाराष्ट्राला पुन्हा सुगीचे आनंदाचे आणि मानवतेचे दिवस येऊ दे, अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो,’ अशी प्रार्थना त्यांनी केली असून महायुती सरकारवर (Mahayuti Government) आगपाखड केली आहे.

शेतकरी रडतोय, शासनाला सद्बुद्धी दे

नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना वडेट्टीवार म्हणाले, “या विघ्नहर्त्याला हात जोडून महाराष्ट्रातील लुटारू आणि भ्रष्टाचारी सरकार घालवण्यासाठी सद्बुद्धी दे. मराठवाड्यातील शेतकरी रडतोय. शासनाला सद्बुद्धी दे आणि शेतकऱ्यांना मदत लवकर मिळावी अशी प्रार्थना करतो,” विजय वडेट्टीवार यांनी यावेळी राज्यातील सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ते पुढे म्हणाले, “बाप्पाचे आगमन आज होत आहे. मात्र २ महिन्यांनी महाराष्ट्रावरचे संकट दूर होईल,” असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलाय आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत ते म्हणाले, “महाभारताचे उदाहरण देऊन ते कलियुगातील अभिमन्यू आहेत असे म्हणत आहेत. जो सतयुगात सुटला नाही तर आधुनिक युगात अभिमन्यू तयार होताच नाही. अभिमन्यूला रिमोटची गरज नसते. त्या अभिमन्यूला त्यांच्याच पक्षातील रिमोट कंट्रोल करतोय,” असे ते म्हणाले.

गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात हे विद्यापीठ व्हावे

नाशिक येथे स्थापन होणाऱ्या आदिवासी विद्यापीठाबाबत बोलताना ते म्हणाले, “निवडणुकीच्या तोंडावर आदिवासी युनिवर्सिटी स्थापन करण्याचा निर्णय घेत आहेत. ती नागपुरात किंवा गडचिरोलीला होणे अपेक्षित असताना ती नाशिकला करण्याचा निर्णय घेतला आहे त्याचा मी निषेध करतो. विदर्भामध्ये आदिवासी समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. नाशिक सारख्या प्रगत क्षेत्रात होऊन उपयोग काय ? गडचिरोलीसारख्या आदिवासी दुर्गम भागात जर युनिवर्सिटी आली तर आदिवासी समाजाला त्याचा उपयोग होईल. सरकारला माझी विनंती आहे की गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात हे विद्यापीठ व्हावे आणि या समाजाला न्याय द्यावा.”

आदिवासी प्रशिक्षण संस्था सेंटर वर भाष्य करत ते पुढे म्हणाले, “एक सेंटरसाठी तीन लाख रुपये मोजा असे अधिकारी फरमान काढत आहेत. वरचे ही खातात, खालचेही शांत बसणार नाहीत तुम पॉंच खाते हो तो हम तीन खाते हैं हे सगळे जे चालले आहे ते राज्य विकण्याचे काम सुरु आहे. यातून हे स्पष्ट होते की विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण संस्थांमधून देखील हे पैसे खाणार. कोणाला सोडायचे नाही आणि भ्रष्टाचार केल्याशिवाय रहायचे नाही,या’ असे ते यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

माझं डोकं फिरवू नका, तुमच्यात एवढी खुमखूमी असेल तर… राऊतांची Manoj Jarange Patil यांच्यावर जहरी टीका

विधानसभा निवडणुकीसाठी भाजप ऍक्शन मोडमध्ये; ‘या’ चार नेत्यांवर सोपवली जाणार महत्त्वाची जबाबदारी

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version