विखे पाटीलांनी संजय राऊतांची उडवली खिल्ली

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज सकाळी ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी आली होती आणि त्यांच्या पाठोपाठ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना देखील जीवे मारण्याची धमकी त्यांना भाऊ आमदार सुनील राऊत (Sunil Raut) यांना फोनच्या माध्यमातून आली होती.

विखे पाटीलांनी संजय राऊतांची उडवली खिल्ली

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज सकाळी ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी आली होती आणि त्यांच्या पाठोपाठ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना देखील जीवे मारण्याची धमकी त्यांना भाऊ आमदार सुनील राऊत (Sunil Raut) यांना फोनच्या माध्यमातून आली होती. यासंदर्भामध्ये राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यामधील प्रत्येक नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी शासनाची आहे आणि आम्ही ते पद्धतीने करू असे विखे पाटील म्हणाले. आज पंढरपूर (Pandharpur) इथे आषाढी यात्रा व्यवस्थापन पाहणीसाठी आले असता विखे पाटील बोलत होते. त्यांनतर माध्यमांशी बोलताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलांनी संजय राऊतांची खिल्ली उडवली आहे.

माध्यमांशी बोलताना बोलताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, संजय राऊत हे स्वत:च स्वतःला धमकी देत असतात. शरद पवारांना धमकी देण्यात आले त्या ट्विटर हँडलचे ‘राजकारण महाराष्ट्राचे’ असं या ट्विटर हँडलचं नाव आहे. ‘तुमचा लवकरच दाभोळकर होणार…’ अशी धमकी शरद पवार यांना देण्यात आली आहे. त्यानंतर सकाळी सुप्रिया सुळे यांनी पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली आणि त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. शरद पवारांना काही झाल्यास त्या सगळ्याला राज्य सरकार आणि केंद्र सरकार जबाबदार असणार, असे सुद्धा सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

हे ही वाचा:

Sandipan Bhumre यांनी Chandrakant Khaire यांच्यावर केला सनसनाटी आरोप

Charu- Rajeev Sen यांचा झाला घटस्फोट, फोटो शेअर करत लिहिले…

RBI Governor Shaktikanta Das यांची केली मोठी घोषणा, कर्जाचा हप्ता वाढणार नाही…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version