“शिवसेनेचा मुकाबला एकटा करू शकत नाही म्हणून”, ठाकरे गटाकडून राज ठाकरेंवर खोचक टीका

“शिवसेनेचा मुकाबला एकटा करू शकत नाही म्हणून”, ठाकरे गटाकडून राज ठाकरेंवर खोचक टीका

शिवसेनेला टार्गेट करणे, भारतीय जनता (BJP) पक्ष आणि शिंदे गटाची ताटं उचलण्याचं काम करणं, यापलीकडे राज ठाकरेंच्या भाषणामध्ये कोणताही नवीन मुद्दा नव्हता. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची नक्कल ही करमणूक म्हणून लोकांनी पाहिली आहे. पण जनता त्यांना कधीच स्वीकारणार नाही, उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बोलत असताना त्यांची जीभ तुरुतुरु चालत होती. शिवसैनिकांनी ते मनावर नक्कीच घेतलेलं आहे”, अशी टीका विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केली.

हेही वाचा : 

राज्यपाल कोश्यारींना दिलेला अल्टीमेटम संपला,आता मविआची पुढील भूमिका ‘महाराष्ट्र बंद’?

शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) या पक्षामध्ये एवढी पडझड होऊन सुद्धा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ज्या ताकदीने उभे राहिले आहेत ते पाहून त्यांच्याबद्दल द्वेष आणि तनुक्षित मन लक्षात ठेवून राज ठाकरे यांचं भाषण होते, त्यांनी असे किती भोंगे उतरवले आहेत? भोंग्याचा प्रश्न असेल, खळखट्याक, मराठी पाट्यांचा विषय असेल किंवा टोल मुद्दा असेल, ही सगळी फक्त आंदोलन करायची, सेटिंग करायचे आणि त्याच्यातून मग पळकुटेपणा काढायचं धोरण राज ठाकरे यांचं आहे. त्यांच्या मनसेचं असं कर्तृत्व आहे”, असा घणाघात विनायक राऊतांनी केला.

महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना जिंकून येईल म्हणून आमचं राज ठाकरे (Raj Thackeray) सहित भाजप शिंदे सरकार सर्वांना आवाहन आहे, हिंमत असेल या महिन्यात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लावा, असे विनायक राऊत यांनी म्हटले.

आमच्या सरकारबद्दल लोकांचे मत चांगले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्वतःच्या स्वार्थासाठी आणि पैशासाठी दिसेल तो हात हातात घ्यायचा ; राज ठाकरे

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज गट अध्यक्षांचा मेळावा घेतला. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री पदावर असताना तब्यतीचं कारण सांगून… आणि आता एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) रात्री कांडी फिरविली. आता फिरतात सगळे. स्वतःच्या स्वार्थासाठी आणि पैशासाठी दिसेल तो हात हातात घ्यायचा नि फिरायचं हे मी करत नाही. उद्धव ठाकरे यांच्या अंगावर एकतरी केस आहे का. भूमिका घ्यायची नाही. फक्त पैशासाठी, स्वार्थासाठी कधी हा कधी तो, अशी टीका राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केली.

Margsheesh fasting मार्गशीष उपवासासाठी खास अप्पे, जाणून घ्या रेसिपी

Exit mobile version