Sunday, July 7, 2024

Latest Posts

Sangali Loksabha Election 2024 विजयावर Uddhav Thackeray नाराज नाहीत, Vishal Patil यांचे वक्तव्य

काँग्रेसच्या (Congress) विशाल पाटील (Vishal Patil) यांनी अपक्षपणे निवडणूक लढवत विजय प्राप्त केला. यावर आज (शुक्रवार, ७ जून) विशाल पाटील आणि काँग्रेस नेते विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल (Loksabha Election 2024 Result)स्पष्ट झाला असून देशभरातुन एनडीए आघाडीला (NDA Alliance) बहुमत प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) बाजी मारत ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी ३० मतदारसंघांवर विजय मिळवला आहे. अश्यातच सांगली लोकसभा निवडणुकीचा (Sangali Loksabha Constituency) विषय मात्र चर्चेत राहिला. महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठा (Shivsena UBT) गटाच्या चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेसच्या (Congress) विशाल पाटील (Vishal Patil) यांनी अपक्षपणे निवडणूक लढवत विजय प्राप्त केला. यावर आज (शुक्रवार, ७ जून) विशाल पाटील आणि काँग्रेस नेते विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी विश्वजित कदम म्हणाले, “महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याची राजकिय परिस्थिती वेगळी असते. सांगलीची राजकिय परिस्थिती काय आहे हे सातत्याने मांडण्याची भुमिका आम्ही सांगलीतील आमदार म्हणुन काँग्रेस पक्षाकडे गेली सहा महिने करत होतो. सांगलीची जागा दुर्दैवाने आमच्या कडून सुटीली गेली, मात्र जनतेने ही निवडणुक हातात घेतली. जनतेने एक अपक्ष खासदार निवडुन दिला. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची भुमिका कशी होती, का होती त्याच कारण हे आहे कि सांगली काँग्रेस पक्षाचा बालकिल्ला आहे. इंडीया आघाडीचा हेतु काय होता कि भाजपला (BJP) हरवणं, शेवटी भाजपचा पराभव झाला. निवडून आलेला खासदार काँग्रेस पक्षा सोबत आहे. आम्ही काल मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांना भेटुन आमची भुमिका स्पष्ट केली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) राज्यातील वरिष्ठ नेते आहेत व्यक्तिगत स्तरावर आम्हाला त्यांचा आदर आहे. आज ते मोठ्या संर्घषात महाराष्ट्राचं नेतृत्व करतात याविषयीसुद्धा आम्हाल त्याचा आदर आहे.”

विशाल पाटील यावेळी म्हणाले, “उद्धव ठाकरे कुठेही नाराज आहेत असं मी ऐकलं नाही. पक्षाचे प्रमुख म्हणुन त्यांची भुमिका स्वाभाविक आहे. बाळासाहेब ठाकरे आणि वसंतदादा पाटील आमचे आजोबा यांचे चांगले घनिष्ठ संबंध होते. उद्धव ठाकरे यांना आनंद असेल, मला वाटत नाही त्यांची मनधरणी करावी लागेल, तसं काल सकारात्मक संजय राऊत सुद्धा म्हणाले. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढची वाटचाल करु,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

मतदारांनी चौथ्यांदा संधी दिली, आता जबाबदारी वाढली: Supriya Sule

“INDIA आघाडीची ओळख घोटाळ्यांचीच” ; Pm Narendra Modi यांची विरोधकांवर घणाघाती टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss