Vishalgad Encroachment झालेल्या दंगलीला जबाबदार Sambhaji Bhide: Jitendra Awhad

Vishalgad Encroachment झालेल्या दंगलीला जबाबदार Sambhaji Bhide: Jitendra Awhad

Vishalgad Encroaachment: राज्यात सध्या विशाळगड अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच गरम झाले आहे. विशाळगड आणि पायथ्याच्या गावांमध्ये झालेल्या दगडफेक आणि इतर हिंसक घटनांमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अश्यातच राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (NCP Shaarad Pawar) गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पत्रकार परिषद घेत यावर मोठे भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी महायुती सरकारसह (Mahayuti Government) शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे (Shivpratishthan Hidusthan) संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्यावर टीका करत विशाळगडावर दंगल भडकवण्याचे आरोप केले आहेत. “कोल्हापूरची दंगल ही संभाजी भिडे यांनी पेटवली होती आणि ही दंगल देखील त्यांनीच पेटवली आहे,” अश्या शब्दात त्यांनी संभाजी भिडेंवर तोंडसुख घेतले आहे.

यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “सरकारला माहिती होत की या ठिकाणी काहीना काही घडणार आहे. तिथे सरकारने याबाबतची दक्षता घ्यायला पाहिजे होती. पश्चिम महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण केला जातो. नेमके निवडणुकीच्या तोंडावर असे प्रकरण करतात. विशाळगडावर महाराजांचा इतिहास आहे. जे भाजप करते आहे जे सरकार करत आहे त्याचा फायदा कसा मिळेल हे बघितलं जात आहे. कोल्हापूरची दंगल ही संभाजी भिडे यांनी पेटवली होती आणि ही दंगल देखील त्यांनीच पेटवली आहे. भीमा कोरेगाव, सांगली आणि मिरज इथे झालेल्या दंगलीला जबाबदार संभाजी भिडे आहेत,* असे ते यावेळी म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत ते म्हणाले, “जेम्स लेनच्या बाजूला असणाऱ्याला विचारू नये की आम्ही कोणाच्या बाजूने आहोत. तेव्हा हे कुठे झोपले होते?” कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांनी विशाळगड प्रकरणावरून पत्र लिहीत “राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचाराने प्रगल्भ असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात अशी घटना घडली, हे अत्यंत क्लेशदायक आहे,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. याबाबत बोलताना आव्हाड म्हणाले, “ही महाराष्ट्राची परंपरा आहे. मला अभिमान आहे शाहू महाराज यांचा…”

हे ही वाचा:

ASHADHI EKADASHI 2024 : CM EKNATH SHINDE यांनी आषाढी एकादशी निमित्त मागितले विठुरायाकडे साकडे

CM EKNATH SINDE यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा संपन्न; १०३ कोटी रुपये निधीची केली घोषणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version