spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

VISHALGAD ENCROACHMENT: जाती-जातींमध्‍ये द्वेषाचे विष कालवून जातीय…Narayan Rane यांची पोस्ट चर्चेत

विशाळगडावरील अतिक्रमण (Vishalgad Encroachment) हटवण्याची मागणी घेऊन काही शिवभक्त गडावर गेले होते. यावेळी त्यांनी दगडफेक आणि तोडफोड केल्याच्या व्हिडीओ आता समोर येऊ लागल्या आहेत. यावरून पोलिसांनी स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatarapati) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. विशाळगडावर झालेल्या दगडफेकीच्या (Vishalgad Stonepelting News) घटनेनंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, आता कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj Chhatrapati) यांनी आज (मंगळवार, १६ जुलै) विशाळगड येथे भेट दिली होती. याचवेळी त्यांच्यासोबत काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil) हेसुद्धा होते. मात्र पोलिसांनी त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने गडावर जाण्यास परवानगी नाकारली होती. मुद्द्यावर आता नारायण राणे यांनी भाष्य केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून नारायण राणे (Narayan Rane) यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे.

राजकारण थांबवा! सलोखा राखा! छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या शिवकल्‍याणकारी महाराष्‍ट्रामध्‍ये सध्‍या जाती-जातींमध्‍ये द्वेषाचे विष कालवून जातीय सलोखा धोक्‍यात आणण्‍याचे प्रयत्‍न सुरु आहेत. विविध विचारसरणीचे आणि त्‍यातही नव्‍याने पुढे आलेले काही नेते किरकोळ राजकीय फायदा नजरेसमोर ठेऊन दुहीचे आणि द्वेषाचे विष कालविण्‍याचे पाप करीत आहेत. सर्वसामान्‍यांच्‍या हितासाठी जाती-जातींमध्‍ये संघर्ष निर्माण करीत असल्‍याची बतावणी ही मंडळी करतात. संघर्षामध्‍ये शेवटी सर्वसामान्‍यांचे बळी जातात व नुकसान होते हे मात्र ते विसरतात, असे नारायण राणे पोस्टमार्फत म्हणाले. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या महाराष्‍ट्रामध्‍ये ऐतिहासिक काळापासून जातीय सलोख्‍याचे वातावरण आहे आणि गावा-गावांमध्‍ये लोक गुण्‍यागोविंद्याने नांदतात. या वातावरणाला नख लावण्‍याचे प्रयत्‍न हाणून पाडले पाहिजेत. सर्व जबाबबदार राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन महाराष्‍ट्रातील जातीय सलोखा कायम रहावा यासाठी प्रयत्‍न करावेत असे वाटत असल्याचे मत नारायण राणे यांनी व्यक्त केले.

कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj Chhatrapti) यांनी एक पत्र प्रसिद्ध केले होते ज्यामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचाराने प्रगल्भ असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात अशी घटना घडली, हे अत्यंत क्लेशदायक असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती. 

हे ही वाचा:

Ashadhi Ekadashi 2024: माणसाला माणूस बनवायची धडपड म्हणजे ‘वारी’, Kiran Mane यांची वारकरी संप्रदायावर पुन्हा एक पोस्ट

Ulajh Trailer : देशाच्या उपउच्चायुक्त बनून जान्हवी कपूरने चालवली जादू…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss