spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

विनायक मेटे यांचे निधन; मराठा समाजाचा बुलंद आवाज हरपला

माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा हा अपघात झाला.माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा हा अपघात झाला.

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे(Vinayak Mete) यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मेटे यांचे अपघाती निधन झाले आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Express Highway) ही घटना घडली आहे. माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा हा अपघात झाला. मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात (Navi Mumbai MGM Hospital) दाखल करण्यात आलं होत. मेटे यांच्यासह त्यांच्या बॉडीगार्ड आणि गाडी चालकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

Vinayak Mete car accident
Vinayak Mete car accident

मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर मुंबईच्या दिशेने मेटे येत होते. हायवेवरील पनवेल ते खालपूर दरम्यानच्या माडप बोगद्याजवळ हा अपघात घडला आहे. पुढे जाणाऱ्या गाडीला मेटे यांच्या गाडीने जोरात धडक दिली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गाडीच्या डाव्या बाजूचा चक्काचूर झाल्याचे दिसत आहे. अपघातानंतर मेटे तासभर मदतीच्या प्रतिक्षेत होते. मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते.

Vinayak Mete Accident
Vinayak Mete Accident

मेटे यांचे सहकारी एकनाथ कदम यांनी सांगितलं की, बीडकडून आम्ही मुंबईकडे येत असताना हा अपघात झाला. आम्हाला एका ट्रकने कट मारला. आम्हाला अपघातानंतर एक तास मदत मिळाली नाही, असंही त्यांनी सांगितलं. 100 नंबरला आम्ही फोन केला मात्र त्यांनी फोन उचलला नाही. मदतीसाठी मी प्रत्येकाला विनवणी करत होतो मात्र कुणीही गाडी थांबवली नाही. आम्ही गाड्यांना हात करत होतो, मग एका गाडीवाल्यानं गाडी थांबवली आणि आम्हाला मदत केली. एका तासानंतर तिथं अॅम्ब्युलंस आली. अपघातानंतर मी मेटे यांच्याशी बोललो तर तेव्हा ते माझ्याशी संवाद करत होते, असंही एकनाथ कदम यांनी सांगितलं.

Vinayak Mete Accident
Vinayak Mete Accident

विनायक मेटे हे शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख आहेत. मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनातील मेटे हे महाराष्ट्रातील प्रमुख नेते आहेत.अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे ते अध्यक्ष देखील होते

Latest Posts

Don't Miss