spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Gujarat Election 2022 पहिल्या टप्प्यात ८९ जागांवर मतदान सुरू , तब्बल ७८८ उमेदवारांचं भवितव्य जनतेच्या हाती

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या (Gujarat Election 2022) टप्प्यासाठी गुरुवारी सौराष्ट्र-कच्छ प्रांत व दक्षिणेकडील १९ जिल्ह्यांतील ८९ मतदारसंघांत मतदान पार पडणार आहे. या टप्प्यात ७८८ उमेदवार रिंगणात आहेत. मंगळवारी सायंकाळी पाचला या टप्प्यासाठीचा निवडणूक प्रचार थांबला होता. गुरुवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच दरम्यान मतदान होणार आहे. तसे निवेदन राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून प्रसृत करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानात एकूण ७८८ उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत कैद होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान ५ डिसेंबरला पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित एकूण ९३ जागांसाठी ८३३ उमेदवार हे मैदानात असणार आहेत. या निवडणुकीसाठी भाजप, आम आदमी पार्टी आणि काँग्रेसने जोरदार प्रचार केला आहे.

तर पहिल्या टप्प्यात भाजप आणि काँग्रेस सर्व ८९ जागांसाठी लढत आहेत. आप(आम आदमी पक्षा)ने ८८ जागांवर आपले उमेदवार उभे केलेत. बहुजन समाज पक्षानेकडून ५७ उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे. असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएम पक्षाने पहिल्या टप्प्यात केवळ ६ उमेदवार उभे केले आहेत.

हेही वाचा : 

दुचाकी चालकांनो सावधान! आजपासून ‘या’ शहरात हेल्मेटसक्ती, नियमांचा भंग केल्यास दंडात्मक कारवाई

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनीही जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे- “आज गुजरात निवडणुकीचा पहिला टप्पा आहे. मी आज मतदान करणाऱ्या सर्वांना, विशेषत: पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांना विक्रमी संख्येने मतदान करण्याचे आवाहन करतो.”

मतदानापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांनी ट्विट केले की, “गेल्या दोन दशकांमध्ये गुजरात हा विकास आणि शांतता यांचा समानार्थी शब्द बनला आहे, ज्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. पण गुजरातच्या जनतेने निवडून दिलेल्या मजबूत सरकारमुळे हे शक्य झाले. त्यांना आवाहन करा. विकासाचा हा प्रवास सुरू ठेवण्यासाठी मतदारांनी अभूतपूर्व उत्साह आणि संख्येने मतदान करावे.

beetroot बीट या कंदमुळापासून बनवा टेस्टी हलवा

गुजरातमधील एकूण चार कोटी ९१ लाख ३५ हजार ४०० पैकी दोन कोटी ३९ लाख ७६ हजार ६७० मतदार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदान करण्यास पात्र आहेत. एकूण १४,३८२ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, त्यापैकी तीन हजार ३११ केंद्र शहरी भागात व ११ हजार ०७१ केंद्र ग्रामीण भागात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून समोर येत आहे.

Green Apple ‘व्हिटॅमिन सी’ उपयुक्त असणाऱ्या हिरव्या सफरचंदाचे फायदे

Latest Posts

Don't Miss