आपण स्वभावाने लोकशाही समाज आहोत, मन की बातमधून पंतप्रधान मोदींनी साधला संवाद

भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे आणि आपला देश लोकशाहीची जननी आहे याचा आम्हा भारतीयांना अभिमान आहे.

आपण स्वभावाने लोकशाही समाज आहोत, मन की बातमधून पंतप्रधान मोदींनी साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून आज देशाला संबोधित केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशभरातील लोकांनी त्यांच्यापाशी आपले विचार मांडले. यावेळी अनेकांनी प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे कौतुक केले. जैसलमेर येथील पुलकितने त्यांना म्हंटले की, परेड दरम्यान ड्यूटी मार्ग तयार करणाऱ्या कामगारांना पाहून मला खूप आनंद झाला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, मोठ्या संख्येने पद्म पुरस्कार विजेते आदिवासी समुदाय आणि आदिवासी समाजाशी संबंधित लोक आहेत. आदिवासी जीवन शहरी जीवनापेक्षा वेगळे आहे, त्यांना स्वतःची अशी वेगळी आव्हाने देखील आहेत. एवढे सगळे करूनही आदिवासी समाज आपल्या परंपरा जपण्यासाठी नेहमीच तत्पर असतो.

पुढे ते म्हणले, भारताच्या प्रस्तावानंतर संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय योग दिन आणि आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. योगाचा संबंध आरोग्याशीही आहे आणि बाजरीही आरोग्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे या दोन्ही मोहिमेतील लोकसहभागामुळे क्रांती नक्कीच घडून येईल. गोव्यातील पर्पल फेस्टिवलबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणले, गोव्यात पर्पल फेस्टचा कार्यक्रम झाला. दिव्यांगांच्या कल्याणासाठी हा एक अनोखा प्रयत्न होता. यामध्ये ५० हजारांहून अधिक बंधू-भगिनी सहभागी झाले होते. येथे आलेल्या लोकांना आता ‘मीरामार बीच’चा पूर्ण आनंद घेता येईल. तसेच पद्म पुरस्कारांच्या विजेत्यांबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, टोटो, हो, कुई, कुवी आणि मांडा यांसारख्या आदिवासी भाषांवर केलेल्या कामासाठी अनेक महान व्यक्तींना पद्म पुरस्कार मिळाले आहेत. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. सिद्दी, जारवा आणि ओंगे आदिवासींसोबत काम करणाऱ्यांनाही यावेळी बक्षीस देण्यात आले आहे.

भारतीय संसदेबद्दल काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

डॉ.आंबेडकरांनी बौद्ध, भिक्षू संघाची तुलना भारतीय संसदेशी केली होती. त्यांनी या संस्थेचे वर्णन केले की, जिथे गती, ठराव, कोरम आणि मतमोजणी यासाठी अनेक नियम आहेत. भगवान बुद्धांना त्या काळातील राजकीय व्यवस्थेतून प्रेरणा मिळाली असावी, असे बाबासाहेबांचे मत होते. भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे आणि आपला देश लोकशाहीची जननी आहे याचा आम्हा भारतीयांना अभिमान आहे. लोकशाही आपल्या नसात आहे, आपल्या संस्कृतीत आहे. शतकानुशतके आपल्या कार्याचाही तो अविभाज्य भाग आहे. आपण स्वभावाने लोकशाही समाज आहोत.

पंतप्रधान मोदींच्या मन कि बातचा हा ९७ वा भाग आहे. पंतप्रधान मोदी नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर जनतेशी त्यांच्या मन कि बात या कार्यक्रमातून संवाद साधत असतात. कधी ते एखाद्या गंभीर मुद्द्यावर बोलतात तर कधी एखादी आनंदाची बातमी किंवा महत्त्वाची घोषणा मन कि बात मधून लोकांपर्यंत पोहोचवतात. नरेंद्र मोदींचा मन कि बातचा १०० वा भाग खूपच खास असणार आहे आणि बहुदा तो एप्रिल महिन्यात प्रदर्शित केला जाईल. यासाठी लोगो मेकिंग आणि जिंगल मेकिंगच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच स्पर्धेत भाग घेण्यासाठी इच्छुक असलेले लोक त्यांचा लोगो आणि जिंगल १ फेब्रुवारीपर्यंत स्पर्धेसाठी पाठवू शकतात.

हे ही वाचा:

IND vs NZ, भारतासाठी करो या मरोचा सामना, ‘या’ खेळाडूंना मिळू शकेल सामन्यात खेळण्याची संधी

लिंगायत समाजाचा देखील मुंबईत महामोर्चा, मागण्या पूर्ण न केल्यास दिला ‘हा’ इशारा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version