Monday, September 30, 2024

Latest Posts

शिवसेना आणि काँग्रेसला आमच्याकडून निरोप गेला आहे; युतीसंदर्भात आपली…; प्रकाश आंबेडकर

शिवसेनेमध्ये उभी फूट पढल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिवसेनेचे बंड केलेल्या आमदारांनी भारतीय जनता पक्षा बरोबर जाऊन युती केली आणि महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन केलं. येणाऱ्या अंधेरी पोटनिवडणुकी मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस युती होणार हे स्पष्ट झाले आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकार आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी युतीसंदर्भात मोठे विधान केले होते. त्यांनी शिवसेना आणि काँग्रेसशी आम्ही युती करायला तयार आहोत, असे सांगितले होते. याच भूमिकेबद्दल प्रकाश आंबेडकरांनी आता अधिक भाष्य केले आहे. शिवसेना आणि काँग्रेसला आमच्याकडून निरोप गेला आहे. आता त्यांनीच युतीसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करायला हवी, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. ते जालना शहरात पत्रकार परिषमध्ये बोलत होते.

चित बाहुजन आघाडीच्या महाराष्ट्र समितीच्या अध्यक्षा रेखा ठाकूर यांनी हिन्याभरापूर्वीच काँग्रेस आणि शिवसेनेसोबतच्या युतीसंदर्भात भूमिका घेतली होती. युती करायची असेल तर ती काँग्रेस आणि शिवसेनेसोबत करू. मात्र अद्याप काँग्रेस आणि शिवसेना यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. काँग्रेस आणि शिवसेनेची भूमिका अस्पष्ट आहे. ही भूमिका जोपर्यंत स्पष्ट होत नाही, तोपर्यंत सर्वच पक्ष वेगवेगळे लढतील असे आम्ही गृहीत धरले आहे. आम्ही स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीला लागलो आहोत, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

वंचित बहुजन आघाडी काँग्रेस आणि शिवसेनेशी युती करण्यास तयार आहे. तसा प्रस्तावही उभय पक्षांना पाठवण्यात आला आहे. मात्र वंचित बहुजन आघाडी राष्ट्रवादीशी जुळवून घेण्यास तयार नाही. त्यामागे नेमके कारण काय आहे? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. याबाबत विचारले असता प्रकाश आंबेडकरांनी थेट बोलणे टाळले आहे. आम्ही आमच्याकडून निरोप पाठवलेला आहे. आता त्यांनी या निरोपाला उत्तर देण्याची गरज आहे. राष्ट्रवादीशी युती करण्यास आम्ही तयार का नाही? याचे उत्तर योग्य वेळी देऊ, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

हे ही वाचा:

तुकाराम मुंढे पुन्हा अॅक्शन मोडमध्ये, रात्री उपलब्ध नसणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई होणार

राजकीय नेत्यांचे ‘फोन टॅपींग’ प्रकरणात पोलीस आयुक्तांच्या विरोधात ‘क्‍लोजर रिपोर्ट’ दाखल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss