न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे, आमची न्यायाची बाजू आहे: विनायक राऊत

दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचारांचं सोनं लुटलं जाईल

न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे, आमची न्यायाची बाजू आहे: विनायक राऊत

Vinayak Raut

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा (Shiv Sena Dasara Melava ) घेण्याची परवानगी हाय कोर्टाने शिवसेनेला दिली आहे. त्यामुळे यंदा शिवसेनाच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेणार असल्याच निश्चित झालं आहे. ज्याप्रमाणे न्यायालयाच्या या निर्णयानंतर विरोधी पक्षाने अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याचप्रमाणे आता शिवसेनेच्या नेत्यांकडून देखील आता या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला जात आहे.

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी हा सत्याचा विजय असल्याचे म्हटले आहे. “न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. त्यामुळे उच्च न्यायालयात देखील शिवसेनेच्या बाजूने निकाल लागेल. आमची न्यायाची बाजू आहे. आमच्याकडे कोणतीही खोट नाही. आम्ही प्रत्येकवेळी कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घेतो. येवळी देखील ही दक्षता देण्यात येईल आणि दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचारांचं सोनं लुटलं जाईल असे विनायक राऊत यांनी म्हटले आहे.

न्यायालयाने आज जो निर्णय दिलाय त्यावरून तरी आता भाजप आणि शिंदे गटाने शिवसेनेच्या मार्गात येण्याचं बंद करावं. दसरा मेळाव्याला कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. परंतु, शिंदे गट गेल्या दोन महिन्यापासून पिसाळला आहे. त्यांच्या गटातील काही आमदार गुंडगीरी करत आहेत. शिवसैनिकांना मारण्याची धमकी देत आहे, शिवाय पोलिस ठाण्यात गोळीबार करत आहेत. त्यामळे सरकारने आपल्या आमदारांना शांततेचे धडे द्यावेत, अशी टीका विनायक राऊत यांनी शिंदे गटावर केलीय.

हे ही वाचा:

Uddhav thackeray live : विजय नेहमी सत्याचाच होतो

हायकोर्टाच्या निर्णयाविरुद्ध शिंदे गट जाणार सुप्रीम कोर्टात?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version