महापालिका निवडणुकांपूर्वीच निकाल लागावा याबद्दलचा आमचा आग्रह आहे ; अनिल देसाई

महापालिका निवडणुकांपूर्वीच निकाल लागावा याबद्दलचा आमचा आग्रह आहे ; अनिल देसाई

एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचं मुख्यमंत्रीपद वैध आहे की नाही, यावर सुप्रीम कोर्टात (Supreme court) आज महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने ज्या आमदारांना अपात्रतेची नोटीस दिली होती, त्यात एकनाथ शिंदेदेखील आहेत. सुप्रीम कोर्टातील घटनापीठासमोर या प्रलंबित याचिकेवर आज सुनावणी झाली. मात्र आता ही सुनावणी २९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. राज्यातील सत्ता संघर्षाचा पेच अजूनही कायम आहे. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) या प्रकरणावर २९ नोव्हेंबर रोजी सुनावणी करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे हे प्रकरण अधिक काळ चालण्याची चिन्हे दिसत आहेत. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेसह (bmc) महाराष्ट्रातील इतर महापालिका निवडणुकांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने निकाल द्यायला हवा, अशी मागणी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने (shivsena) केली आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी मीडियाशी संवाद साधताना ही मागणी केली आहे.

अनिल देसाई यांनी मीडियाशी संवाद साधताना ही मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूच्या पक्षकारांना ज्वॉइंट सबमिशन देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाशी संबंधित ज्या चरा पाच गोष्टी आहे. तसेच ज्या गोष्टींवर तुम्हाला न्याय हवा असं वाटतं ते मुद्दे लेखी लिहून द्या. आम्ही त्याचं अवलोकन करू. तुम्ही लेखी निवेदन दिल्यानंतर आम्हाला अभ्यास करता येईल असं कोर्ट म्हणाले. तसेच त्यासाठी दोन्ही पक्षकारांना तीन आठवड्याचा वेळ देण्यात आला आहे, असं अनिल देसाई यांनी सांगितलं.

सध्या कोर्टात तारीख पे तारीख सुरू आहे. महापालिका निवडणुकांपूर्वीच निकाल लागावा याबद्दलचा आमचा आग्रह आहे. आमच्या वकिलांनी मांडलेल्या गोष्टी सुस्पष्ट आहेत. न्यायालयाने टिप्पणी म्हणून का होईना काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. लोकशाही सदृढ आहे हे जगासमोर येण्यासाठी निकाल लवकर लागावा हीच आमची अपेक्षा आहे, असंही त्यांनी सांगितलं. राज्यातील सत्ता संघर्षावर आता २९ नोव्हेंबरपासून नियमित सुनावणी होणार आहे. कोर्टाने दोन्ही बाजूच्या वकिलांना त्यांचे मुद्दे आणि गोषवारा सादर करायला सांगितलं आहे. कोर्टाने गोषवारा सादर करण्याची मागणी केल्यानंतर दोन्ही गटाकडून चार आठवड्यांचा वेळ मागितला होता. त्यानुसार कोर्टाने हा वेळ दिला आहे.

हे ही वाचा :

Sangli News : गौतमी पाटील यांची लावणी, प्रेक्षकांचा धिंगाणा मात्र भूर्दंड जिल्हा परिषद शाळेला

Gujarat Election 2022 : मोरबी विधानसभा जागेवर कोणाचे वर्चस्व आहे?, पूल दुर्घटनेनंतर गुजरात राजकारण रंगला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version