आमच्या स्वार्थासाठी आम्ही कधीही युती तोडणार नाही, दीपक केसरकारांचे वक्तव्य

आज सत्तेत असलेल्या शिंदे गटाचे प्रवक्ते तथा मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे (Aaditya Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे.

आमच्या स्वार्थासाठी आम्ही कधीही युती तोडणार नाही, दीपक केसरकारांचे वक्तव्य

सत्तेत असलेल्या शिंदे गटाचे प्रवक्ते तथा मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे (Aaditya Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. महापालिकेत भाजपची सत्ता २०१७ साली आली असती. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचा मान ठेवून काही केलं नाही, असा दावा त्यांनी आज माध्यमांशी बोलताना केला आहे.

मंत्री केसरकर यावेळी म्हणाले की, हे आमच्या बद्दल सर्वत्र काहीही बोलत आहेत. पण आता आमचा प्रत्येक प्रवक्ता यांना उत्तर देईल. कारण आम्ही काही बोललो नाही तर लोकांना त्यांचं खरं वाटायचं. म्हणून आता आम्ही याचं सर्वाबद्दल बोलू, पण आम्हाला त्यांच्याबद्दल घाणेरडं बोलायचं नाही, असे वक्तव्य दीपक केसरकर यांनी केली. त्याचसोबत पुढे ते म्हणाले, भाजप आणि शिंदे गट महापालिकेतही युती करणार आहे. दोघंही मिळून १५० पेक्षा अधिक जागा निवडून आणू. आमची युती आता कायम राहणार आहे, आमच्या स्वार्थासाठी आम्ही कधीही युती तोडणार नाही, असंही ते म्हणाले.

पुढे दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे वर हल्लाबोल केला आणि म्हणाले, बाळासाहेबांची इच्छा नसणाऱ्या लोकांसोबत सत्ता बनवलीत. महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही मुलगा आणि वडील मंत्री झाले नाहीत. ते यांनी घडवलं. यांना लोकशाहीची परंपरा तोडावी लागली. आदित्य ठाकरे हे चुकीच्या गोष्टी पसरवत आहेत. गोबेल्सची नीती ते वापरत आहेत. महाराष्ट्रात गोबेल्स तयार होऊ नयेत, असंही ते म्हणाले. राज्यात आदित्य ठाकरेंची शिव संवाद यात्रा सुरू आहे. ही शिवसंवाद नाही तर विसंवाद यात्रा आहे. छत्रपतींच्याबद्दल ज्यांनी करार पत्र लिहून घेण्याचं काम केलं. ते यात्रा शिवाजी महाराजांच्या नावाने करत आहेत. तुम्ही जो शब्द वापरता त्याचा तुम्हीही विचार करा. तुम्ही लोकप्रनिधींचा अनादर करता, असं केसरकर म्हणाले. सहजासहजी कुणी आपली पदं सोडत नाहीत. आम्ही आमची पदं दावाला लागली. सहजासहजी कुणी कोर्टासमोर जात नाही. पण आम्ही गेलो. कोर्ट निर्णय घेईलच, असंही ते म्हणाले.

केसरकर म्हणाले की, अमित शाहांच्या चर्चेचा हवाला देता तर मोदी यांच्यासोबत काय चर्चा झाली ते सांगा. भाजपशी चर्चा न करता राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत सरकार बनवलं गेलं. जनतेला दिलेला शब्द यांनी मोडला, असेही पुढे केसरकर म्हणाले. आम्हीही कोर्टात आमचे मुद्दे मांडू. पक्षात लोकशाही आहे का? याबाबत आम्ही मुद्दे मांडू. आम्ही भाजपसोबत जाऊ, जे बाळासाहेबांनी सांगितलं होतं ते आम्ही पाळू, असे वक्तव्य दीपक केसरकर यांनी केले आहे.

हे ही वाचा :-

स्कूल बसला भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यात शिव संवाद यात्रेचे स्वागत करणारे बॅनर फाडले

Exit mobile version