राज्यात सरकार बदलल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही – शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बीड जिल्ह्यातील परळी येथील राष्ट्रीय समाज पक्षाचे मोठे नेते राजेश (राजाभाऊ) फड यांचा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.

राज्यात सरकार बदलल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही – शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बीड जिल्ह्यातील परळी येथील राष्ट्रीय समाज पक्षाचे मोठे नेते राजेश (राजाभाऊ) फड यांचा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी राज्यसभा खासदार फौजिया खान आणि बीडचे खासदार बजरंग सोनवणे, सरचिटणीस अदितीताई नलावडे, सरचिटणीस रवींद्र पवार, यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना शरद पवार म्हणाले की, सत्ता ही लोकांसाठी वापरायची असते, तुमच्या भागात सत्तेचा दुरुपयोग केला जातो, त्यावर जो कोणी आवाज उठवतो, त्याचा आवाज दाबला जातो. राजकारण हे समाजकारणाला स्थान देणारं पाहिजे, येथील चित्र बदलतय, लोकसभा निवडणुकीआधी सुद्धा ते दिसलं. देशाचे पंतप्रधान सांगत होते आम्ही ४०० पार निवडून येणार, पण त्यांचे किती खासदार आले. राष्ट्रवादी काँग्रेसने १० जागा लढवल्या, त्यापैकी 8 जागा आपण जिंकून आणल्या, असे शरद पवार म्हणाले. आमच्या नावावर निवडून आले आणि मग भाजप सोबत सत्तेत जाऊन बसले, लोकांची फसवणूक या लोकांनी केली आणि सत्तेमध्ये सहभागी झाले, ज्यांनी आमच्या नावावर निवडणुका जिंकून सरकार स्थापन केले त्यांनी आम्हाला सोडून दिले आहे. ही तर फक्त सुरुवात आहे, परळीमध्ये मोठी सभा आपण घेऊ आणि दाखवून देऊ. राज्यात सरकार बदलल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. असेही शरद पवार म्हणाले.

बीड हा शरद पवार साहेबांचा जिल्हा – खासदार बजरंग सोनवणे

परळी काय करते? लोकसभेत दाखवून दिलंय, शरद पवार साहेबांचा नाद केल्यावर काय होतं?. शरद पवार साहेब यांना मानणारा जिल्हा म्हणून बीड जिल्हा ओळखला जातो. या जिल्ह्यात पवार साहेबांची ताकद आहे, यावर संशोधन करण्याची गरज नाही, असे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटलं. तसचे, राजे भाऊ तुमचं कौतुक, तुम्ही खरे बोलणारे आहात. परळीतून ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला ते सावध रहा, बळजबरी कोणाला येथे प्रवेशाला आणलं नाही. राजाभाऊ यांनी कुठलीही अट ठेवली नाही. आता, २ महिने तुम्ही सहन करा, खासदार म्हणून मी तुमच्या सोबत आहे, आता आपलं सरकार येणार आहे, असे बजरंग सोनवणे यांनी म्हटले आहे.

कुणाचाही नाद करा पण शरद पवार साहेबांचा नाद करु नका !- राजेश फड

शरद पवार साहेब यांचे मी आभार मानतो त्यांनी मला पक्षात प्रवेश दिला. पीक विमा हा आमच्या परळी तालुक्यात २५ टक्के शेतकऱ्यांना मिळतो आणि बाकीचे ७५ टक्के पिक विम्याची रक्कम वाटली जाते, पण आपली सत्ता आली तर तुम्ही याची चौकशी लावा अशी मागणी राजेभाऊ फड यांनी शरद पवार यांच्याकडे केली. पक्ष प्रवेशाला आम्ही जेव्हा परळीमधून मुंबईसाठी निघत होतो तेव्हा आम्हाला आणि आमच्या गाडीला अडवलं आहे आणि ते घाबरलेले आहेत असेही फड यांनी सांगितले. बराच निधी आमच्या परळीला मिळाला आहे, पण तो निधी कुठे गेला, या संदर्भातील माहिती माझ्याकडे आहे. त्यासंदर्भात मी लवकरच हायकोर्टात जाणार आहे. आताचे आमदार यांनी पवार साहेबांशी गद्दारी केली आहे आणि या आमदाराची परळीमध्ये अलीबाबा आणि 40 चोरची टीम आहे, त्यामुळे फक्त याच लोकांचा विकास झाला आहे. मी शरद पवार साहेब यांच्या पक्षात जाणार आहे, त्यामुळे पोलीस संरक्षण काढून घेतलं आणि माझ्यावर गुन्हा दाखल करून घेतला. पालकमंत्री तुम्ही बोलला होता ना? कुणाचाही नाद करा पण पवार साहेबांचा नाद करू नका म्हणून मग आत्ता तुम्ही निवडणुकीत बघाच आत्ता आगामी निवडणुकीत काय होत ते असे राजेश फड म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राजेश (राजाभाऊ) फड, अजित पवार गटाचे सोपानराव तोंडे, विक्रम देशमुख, पद्माकर लहाने, कौडगाव घोडाचे माजी सरपंच सतीश कुंडगीर, जळघव्हाणचे माजी उपसरपंच दत्तात्रय कदम, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस मंगलताई सोळंके, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद किरवले, नागापूरच्या माजी सरपंच अश्विनी सोळंके, शिवसेना शिंदे गटाचे बीड जिल्हा संघटक डॉ. जान मोहम्मद शेख व जयगांवच्या माजी सरपंच कुसुमताई शिंदे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह जाहीर पक्षप्रवेश केला आहे.

हे ही वाचा:

अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रामदास आठवले यांची पहिली प्रतिक्रिया, संजय राऊतांवर बोचरी टीका करत म्हणाले…

Akshay Shinde चा घात की घातपात? एन्काऊंटरची स्क्रीप्ट कोणाची?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version