आपण लवकरच सुषमा अंधारे यांची पोलखोल करुन पर्दाफाश करणार; ॲड. वाघमारे यांचा इशारा

आपण लवकरच सुषमा अंधारे यांची पोलखोल करुन पर्दाफाश करणार; ॲड. वाघमारे यांचा इशारा

सध्या ठाकरे गटाची (Uddhav Thackeray) तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांचे विभक्त पती ॲडव्होकेट वैजनाथ वाघमारे (Vaijanath Waghmare) हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. ठाण्यातील टेंभी नाका येथील कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. दरम्यान ॲडव्होकेट वैजनाथ वाघमारे आणि सुषमा अंधारे हे घटस्फोटानंतर एकमेकांपासून वेगळे राहतात.

ॲड. वैजनाथ वाघमारे हे सुषमा अंधारे यांचे पूर्वाश्रमीचे पती आहेत. आज ते शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहेत. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धडाडीचं नेतृत्व आहे. त्यांची भूमिका सर्वसामान्यांना न्याय देणारी आहे. त्यामुळे आपण शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पुढे बोलतांना वाघमारे म्हणाले की, सुषमा अंधारे आणि मी १५ वर्षे सोबत काम केलं. मात्र मागील पाच-सहा वर्षांपासून माझा आणि त्यांचा काहीही संबंध नाही. मात्र त्यांनी एका सन्माननीय मंत्र्यांबद्दल जी आक्षेपार्ह टिपण्णी केली ती निषेधार्ह आहे.

ॲडव्होकेट वैजनाथ वाघमारे यांनी माध्यमांशी संवाद साधतांना सांगितलं कि, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धडाडीचं नेतृत्व आहे. सर्वसामान्यांसाठी ते काम करतात. तसेच, शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब, सर्वसामान्यांसाठी न्यायिक भूमिका असणारा हा मुख्यमंत्री असल्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “यापूर्वी सामाजिक क्षेत्रात खारीचा वाटा म्हणून मी काम केलंय, पण माझा राजकीय वारसा अजिबात नाही. पण माझ्या गावाला राजकीय वारसा आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, उस्ताद लहुजी साळवे, वासुदेव बळवंत फडके यांच्याकडून प्रेरणा घेत समाजाला न्यायिक भूमिका समजावण्याचं काम मी आणि सुषमा अंधारेनं सोबत केलंय”

हे ही वाचा :

पाकिस्ताने इंग्लंड समोर ठेवले १३८ धावांचे आव्हान

Sushma Andhare: विभक्त पती वैजनाथ वाघमारेंच्या शिंदे गटातील प्रवेशावर सुषमा अंधारेंची पहिली प्रतिक्रिया…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version