आम्ही फडणवीसांना सरप्राईज देणार, जयंत पाटलांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

"२०२४ पर्यंतचे सर्व आश्चर्य संपले आहेत. शिंदे आणि आम्ही २४ मध्ये अनेक राजकीय धक्के देऊ.

आम्ही फडणवीसांना सरप्राईज देणार, जयंत पाटलांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन’ (Majha Maharashtra Majha Vision 2023) कार्यक्रमात बोलताना केलेल्या गौप्यस्फोटामुळे सध्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तसेच या वेळी बोलत असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, २०२४ मध्ये आम्ही अनेक राजकीयन धक्के देणार आहोत. तर त्यांच्या या वक्तव्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये येणार का?, या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, “२०२४ पर्यंतचे सर्व आश्चर्य संपले आहेत. शिंदे आणि आम्ही २४ मध्ये अनेक राजकीय धक्के देऊ. गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राची ग्रोथ थांबली होती. ती ग्रोथ आम्हाला वाढवायची आहे. सरकारवर आम्हाला लक्ष ठेवायचे आहे.”

‘एबीपी माझा’च्या ‘माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन’ या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते. एबीपी माझाच्या याच कार्यक्रमच्या दुपारच्या सत्रात बोलत असताना जयंत पाटील म्हणाले की, आजच्याप्रमाणे निराशाजनक चित्र २०२४ मध्ये नसेल. लोकं हुशार आहेत. ज्यांना आपण आता मत दिलाय तो कुठे आहे आणि तो काय करतोय हे नक्की शोधून काढतील. तसेच पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले कि, महाविकास आघाडी २०२४ मध्ये पुन्हा सत्तेत येईल आणि हेच देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी २०२४ मधलं सर्वात मोठं सरप्राईज असेल. पाटील पुढे म्हणाले की, शिवसेनेच्या मतदारसंघात जावून मी कधीही राष्ट्रवादीचा आमदार निवडून आणू म्हणालेलो नाही. शिवसेनेचं एक वैशिष्ट्य आहे. जे लोक त्यांना सोडून जातात ते पुन्हा निवडून येत नाहीत. सध्या महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती आहे. त्याचा फायदा नक्कीच होईल, असं पाटील म्हणाले.

फडणवीसांचे नेमके काय आरोप केले ?

“माझ्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उद्धव ठाकरेंनी बंद केले. पाच वर्षे आम्ही सत्तेत होतो तरीही ते असं वागले. एवढंच नाही तर मी तुम्हाला हे सांगतो की मी राजकीय वैर ठेवणारा माणूस नाही. मात्र अडीच वर्षांचं महाविकास आघाडी सरकार असताना माझ्यावर केसेस टाकण्याचं, माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचं, काहीही करून मला तुरुंगात टाकण्याचं टार्गेटच त्यावेळी सीपी असलेल्या संजय पांडे यांना दिलं होतं”, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी माझाच्या कार्यक्रमात केला होता.

हे ही वाचा:

दिल्ली-एनसीआरमध्ये आणि जोशीमठमध्ये भूकंप, ३० सेकंद बसत होते भूकंपाचे धक्के

Maghi Ganesh Jayanti 2023, या शुभ मुहूर्तावर करा बाप्पाची पूजा विधी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version