आम्ही त्यावर योग्यवेळी योग्यरितीने बोलूच, सत्यजित तांबेंचं मोठं विधान

मी २००० साली एनएसयूआय या काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेतून कामाला सुरुवात केली. पुढे जिल्हा परिषद सदस्य आणि मग काँग्रेसचा राजाध्यक्ष म्हूणनही काम केले आहे.

आम्ही त्यावर योग्यवेळी योग्यरितीने बोलूच, सत्यजित तांबेंचं मोठं विधान

नाशिक पदवीधर निवडणुकांमुळे हल्ली राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे नक्की कोणत्या पक्षाच्या बाजूने निवडणूक लढवणार हा प्रश्न आता सर्वत्र निर्माण झाला आहे. अशातच यासंबंधी सत्यजित तांबेंनी नाशिकमध्ये घेतलेल्या सभेत एक मोठे विधान केले आहे. तसेच यावेळी बोलताना त्यांनी राजकारण्यांनी त्यांच्या विरुद्ध केलेल्या विधानांसंबंधी देखील भाष्य केले आहे. तसेच या वेळी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

सत्यजीत तांबे म्हणाले, “ज्यावेळी सर्व पक्षांनी मला आणि माझ्या कुटुंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं गेलं. तेव्हा कपिल पाटीलांना मला पाठिंबा दिला. मी आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीचे सर्व शिक्षक, पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो. मला ज्यावेळी मदतीची गरज होती, त्यावेळी त्यांनी मला दिलेला पाठिंबा मी कधीच विसरू शकत नाही. गेली २२ वर्षे मी काँग्रेसच्या माध्यमातून काम करत आहे. मी २००० साली एनएसयूआय या काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेतून कामाला सुरुवात केली. पुढे जिल्हा परिषद सदस्य आणि मग काँग्रेसचा राजाध्यक्ष म्हूणनही काम केले आहे. पुढे ते म्हणाले, मी काँग्रेस पक्षातून गाव, जिल्हा आणि तालुका प्रत्येक पातळीवरून काम केले आहे. चांदा ते बांदा माझ्या ओळखी वाढवल्यात. खरतर कपिल पाटील माझ्यासाठी मतदार संघ शोधात होते. पण, परंतू राजकारण असतं. ते किती असतं हे सर्वांनी मागील चार-पाच दिवसात टीव्हीवर पाहिलंच आहे.”

शिंदे गटानेही दिली प्रतिक्रिया?

दिपक केसरकर यांना सत्यजित तांबेंना शिंदेगट पाठिंबा देणार का? असे विचारले असता. त्यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. दिपक केसरकर म्हणाले, “पाचच्या पाच जागा आम्ही जिंकणार असं नाना पटोले यांनी केलेले वक्तव्य काही चुकीचे नाही. स्वप्न बघणं काही चुकीचं नाही. स्वप्न पाहणं गरजेचं आहे. पण, युतीच्या या पाचही जागा शिंदेगटचं जिंकणार आहे.दोन जागांवर तर आमचे विद्यमान उमेदवारच आहेत. मराठवाड्यामध्ये फाईट होणार आहे पण तिथे सुद्धा आम्हीच जिंकणार आहोत.”

हे ही वाचा:

“तर मी स्वतःला फाशी लावून घेईन” लैंगिक शोषणाच्या आरोपांवर बृजभूषण सिंहांनी दिली प्रतिक्रिया

ज्योतिरादित्य सिंधियांनी इंडिगो प्रकरणात केला तेजस्वी सूर्याचा बचाव म्हणाले, “चूकून इमर्जन्सी एक्झिट उघडली”

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version