spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Andheri By Poll Election 2022 : अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक आम्ही जिंकूच – चंद्रशेखर बावनकुळे

रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेली अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक (Ruruja Latke) होतेय. या निवडणुकीकडे सर्वांचंच विशेष लक्ष लागले आहे. शिंदेगटाच्या बंडानंतर ही पहिली निवडणूक होतेय. त्यामुळे ही निवडणूक ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटासाठी प्रतिष्ठेची झाली आहे. अशात या निवडणुकीतील विजयावर दोन्हीबाजूने दावा केला जातोय.

रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेली अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक (Ruruja Latke) होतेय. या निवडणुकीकडे सर्वांचंच विशेष लक्ष लागले आहे. शिंदेगटाच्या बंडानंतर ही पहिली निवडणूक होतेय. त्यामुळे ही निवडणूक ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटासाठी प्रतिष्ठेची झाली आहे. अशात या निवडणुकीतील विजयावर दोन्हीबाजूने दावा केला जातोय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनीही या निवडणुकीतील विजयावर भाष्य केलंय.

उद्धव ठाकरे मशाल घेतली. अडीच वर्ष राष्ट्रवादी-काँग्रेसबरोबर युती केली. सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस बरोबर त्यांनी हात मिळवणी केली. मशाल काँग्रेसच्या हाती आहे. त्याच हातात घड्याळ आहे! त्यामुळे त्यांना मतदार मतदान करणार नाहीत. बाळासाहेबांची शिवसेना शिंदे साहेब नेतृत्वात काम करत आहे. ही सेना उद्धव ठाकरेंची मशाल विझवल्याशिवाय राहणार नाहीत, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.

मुरजी पटेल उमेदवारी जाहीर केली आहे. ते निवडणूक अर्ज भरायला जात आहेत. माझ्यासह अन्य भाजप नेते त्यांच्यासोबत हा फॉर्म भरायला जात आहेत. आम्हीच जिंकू असा आम्हाला ठाम विश्वास आहे. शिवाय ५१ % मत घेऊ आणि अंधेरी पूर्व विधानसभेची निवडणूक जिंकू, असा विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केलाय.

शिंदेगटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरूनच बरंच राजकारण झालं. त्यावर बोलताना लटके यांच्या राजीमान्याशी आमचा काहीही सबंध नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. शिवसेना आणि काँग्रेसमधून नगरसेवकांनी भजपमध्ये प्रवेश केला आहे. अवधूत तटकरे हे कोकण रायगडमधील खंबीर नेतृत्व आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडून भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे, असं बावनकुळे म्हणाले आहेत.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा अखेर स्वीकारला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेकडून लटकेंचा राजीनामा मंजूर झाला आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा लटकेंचा मार्ग मोकळा झाला आहे. ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं मनपाला दिले होते. त्यानुसार मनपानं त्यांचा राजीनामा मंजूर केलाय. ऋतुजा लटके यांनी मनपा कार्यालयात जाऊन राजीनाम्याचं पत्र घेतले. राजीनामा मंजूर करून घेण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला.

हे ही वाचा :

Andheri East Bypoll 2022 : उमेदवार अर्ज दाखल करण्यापूर्वी ठाकरे गट व भाजपचे जोरदार शक्ती प्रदर्शन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss