spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

संपलेल्या पक्षावर आम्ही बोलत नाही; ठाकरे गटाला मनसेने लगावला टोला

ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटातील (Eknath Shinde) सुरू असणाऱ्या सत्तासंघर्षाला निवडणूक आयोगामुळे एक नवे वळण आले आहे. शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण (Shivsena Election Symbol Bow And Arrow) गोठवण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे.

ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटातील (Eknath Shinde) सुरू असणाऱ्या सत्तासंघर्षाला निवडणूक आयोगामुळे एक नवे वळण आले आहे. शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण (Shivsena Election Symbol Bow And Arrow) गोठवण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे. तसेच शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही, असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. यावर अनेक राजकीय पक्षातील नेते आपली प्रतिक्रिया दिल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या याच निर्णयावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

 मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाला टोला लगावत म्हटलं आहे की, ”संपलेल्या पक्षावर आम्ही बोलत नाही. म्हणणाऱ्यांचं नावही संपलं आणि चिन्ह ही.” असं ते ट्वीट करत म्हटले आहे. तसेच त्यांनी नुकतेच अजून एक ट्विट केले आहे आणि त्या ट्विट मध्ये ते म्हणले आहेत कि, ‘उद्धव ठाकरे यांच्या कडे मोठा गुण आहे जो कुठल्याच ठाकरेंकडे नाही तो म्हणजे गरीब,भोळा चेहरा करून आपल्यावर कसा अन्याय झाला हे सांगणे त्या चेहऱ्याच्या आड आपण आधी करून ठेवलेली लबाडी लपवण्याचं सामर्थ्य आहे ज्याला इंग्रजी मध्ये victim कार्ड अस म्हणतात जे या पुढे सातत्याने बघायला मिळेल’

 निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मनसे प्रवक्ता गजानन काळे यांनी देखील उद्धव ठाकरे गटाला लक्ष केलं आहे. काळे ट्वीट करत म्हटले आहे की, धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं आहे. या पुढे शिवसेना हे नाव पण वापरता येणार नाही. ते पुढे म्हणाले, ”आता शिल्लक सेना प्रमुख यांना राष्ट्रवादीचं घड्याळ, नाहीतर अबू आझमीच्या सायकलचाच आधार आहे. संपलेल्या पक्षाबद्दल बोलत नाही, असे म्हणणारे युवराज यांचा पक्ष आणि चिन्ह आता इतिहासात जमा.”

 मनसे आमदार यांनीही निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते ट्वीट करून म्हणाले आहेत की, बंडखोरांपुढे लोटांगण घालून शेवटपर्यंत सत्ता टिकविण्याचा लाचार हव्यास नडला. त्यांची जर लगेचच पक्षातून हकालपट्टी केली असती, तर किमान पक्षावर नाव व चिन्ह गमावण्याची नामुष्की ओढावली नसती, असं त्ये म्हणाले आहेत. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी ठाकरे गटाला टोमणा लगावत म्हटले की, असो, तरी पण आम्ही तुम्हाला संपलेला पक्ष बोलणार नाही.

हे ही वाचा:

Shiv Sena Symbol: सर्वात मोठी बातमी! शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलं, शिवसेना पक्षाचे नावही वापरता येणार नाही

सावरकरांना ब्रिटिशांकडून पेन्शन कशासाठी मिळत होती, हे फडणवीसांनी स्पष्ट करावे ; नाना पटोले

आयोगाच्या निर्णयानंतर सुषमा अंधारेंचे सूचक ट्विट म्हणाल्या, फडणवीसजी तुम्ही जिंकलात…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss