निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेनेच्या मालमत्तेचे काय ?

काल केंद्रीय निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का दिला आहे निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिल्यामुळे महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे शिवसेनेमध्ये फूट पडली आहे

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेनेच्या मालमत्तेचे काय ?

काल केंद्रीय निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का दिला आहे निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिल्यामुळे महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे शिवसेनेमध्ये फूट पडली आहे तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणात दोन गट झाले आहेत त्यामधला एक शिंदे गट आणि दुसरा ठाकरे गट असे दोन गटांमध्ये विभाजन झाले आहे. दोन्ही गट एकमेकांवर दावे प्रतिदावे करत आहेत तसेच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. ठेवून हि लढाई सर्वाच्च न्यायालयांमध्ये पोहोचली. ठेवून या प्रकरणामध्ये अनेक मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी जडल्या. आता एकनाथ शिंदे गट शिवसेना भवनवरही दावा करणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

केंद्रीय निवडणुक आयोगामध्ये आठ महिन्यापासून सुरु असलेल्या चर्चेत शिवसेना नेमकी कोणाची यामध्ये निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय दिला आहे. आता शिवसेनेच्या ताब्यात असणाऱ्या शिवसेना भावनासह जवळपास २५७ शाखांचे काय?हे प्रश्न उपस्तित होत आहेत. जर शिवसेना भवन, शिवसेना मंत्रालयासमोरचे कार्यालय, विधानभवनात सेनेचे कार्यालय, सामना पेपर, मार्मिक साप्ताहिक यांसारख्या शिवसेनेच्या मालमत्तांवरही शिंदे गटाने दावा केला, तर या सर्व मालमत्ताही शिंदे गटाच्याच ताब्यात जाणार आहे का? हा मोठा प्रश्न उपस्तित होत आहे.

मागील जवळपास 8 महिन्यांपासून केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेना कुणाची? हा लढा अखेर काळ संपुष्टात आला आणि एकनाथ शिंदे यांनाच आता शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण मिळालं. मात्र शिवसेना पक्षाकडे असणाऱ्या मालमत्तेचे काय ? असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे.

शिवसेने पक्षाच्या मालमत्ता कोणत्या आहेत?
शिवसेना पक्षाचे भवन
शिवसेनेचे मंत्रालयासमोरचे कार्यालय विधानभवनातील सेनेचे कार्यालय सामना वृत्तपेपर आणि मासिक साप्ताहिक मिळालेल्या सूत्रांच्या माहितीमध्ये मुंबईतील दादर येथे असणारे शिवसेना पक्षाचे भवन हे कार्यालय उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहणार आहे. कारण हे कार्यालय शिवाई नावाच्या ट्रस्टच्या नावावर आहे. त्याचे अध्यक्ष लीलाधर ढाके आहेत. आणि शिवसेनेचं मुखपत्र असणारं दैनिक सामना मार्मिक साप्ताहिक या प्रबोधन प्रकाशन या पब्लिक लिमिटेड संस्था असल्यामुळे याचीही मालकीही ठाकरे गटाकडेच राहणार.

हे ही वाचा :

शिंदे गटाचं ‘सोशल मीडिया स्ट्राईक’, प्रोफाईल पिक्चर धनुष्यबाण ठेवून व्यक्त केला आनंद Uddhav

Thackeray यांनी बोलावली तातडीची बैठक, काय असेल पुढील भूमिका

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version