शिवसेनेच्या जाहिरातीवर अतुल लोंढे काय म्हणाले…

सध्याच्या राजकारणात कामापेक्षा बॅनर बाजी आणि जाहिरातीला जास्त महत्व दिले जाते. शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले. आणि त्यानंतर शिंदे फडणवीस सरकारच्या राज्यात नवीन पायंडा घातला गेला.

शिवसेनेच्या जाहिरातीवर अतुल लोंढे काय म्हणाले…

सध्याच्या राजकारणात कामापेक्षा बॅनर बाजी आणि जाहिरातीला जास्त महत्व दिले जाते. शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले. आणि त्यानंतर शिंदे फडणवीस सरकारच्या राज्यात नवीन पायंडा घातला गेला. तो म्हणजे बॅनरबाजी आणि जाहिरात. कोणत्याही कामाला सुरवात केली की, या सरकारकडून खप मोठया प्रमाणात बॅनरबाजी आणि जाहिरातीचे प्रदर्शन भरवाले जाते. किंवा आपण म्हणू शकतो जागोजागी होल्डिंग्स आणि मोठे मोठे बॅनर हे लावले जातात. त्यामुळे जनतेचे लक्ष देखील त्या जाहिरातींकडे ओढले जाते आणि जनतेच्या मंदिर आणि ओक्यात सारखे तेच तेच विचार देखील चालूच राहतात. बॅनरबाजी आणि जाहिराती करण्याकडे काळ असतो. आतापर्यंत राज्याच्या राजकारणात ‘देशात नरेंद्र अन् राज्यात देवेंद्र’ अशी जाहिरात आपल्याला सतत पाहायला मिळली जाहिरातीच्या माध्यमातून शिंदे फडणवीस सरकार त्यांनी केलेल्या कामाचे दाखले देताना दिसत असतात.

राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षांकडून मतदारसंघावर दावे केले जात आहेत. याचेच पडसाद भाजप-शिवसेना युतीत उमटताना पहायला मिळत आहेत, कल्याण-डोंबिवलीच्या लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना-भाजप युतीत काही अंशी तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर आजच्या सर्व प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर शिवसेनेनं जाहिरात दिली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आजच्या सर्व प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर शिवसेनेनं जाहिरात दिली आहे. त्यामध्ये “राष्ट्रात नरेंद्र, महाराष्ट्रात शिंदे” असं या जाहिरातीचं ब्रीदवाक्य आहे. दरम्यान शिवसेनेच्या जाहिरातीवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरवात झाली आहे. यात अतुल लोंढेंनी यांनी पहिलीच टीका केली आहे. २०२४ नंतर एक होते शिंदे अशी स्टोरी लिहिली जाईल असं वक्तव्य काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलं आहे. अतुल लोंढे म्हणाले, गुण नाही पण वाण लागला आणि ढवळ्या बाजूला पवळ्या बांधला अशी शिंदे फडणवीस सरकारची केंद्रासोबत दोस्ती आहे. असे देखील ते म्हणाले.

भारत जोडो यात्रेनंतर पस्तीस टक्के लोक मानतात की, राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी समोर आवाहन उभे केले आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्वेनुसार येत्या निवडणुकीत केवळ पाच टक्के मतं ही शिंदे सेनेला मिळणार असे म्हटले आहे. एकच नाही तर असे अनेक सर्वे आले. शिंदे सरकारडून अशा पद्धतीचे सर्वे मांडून खोटा प्रयत्न केला जात आहे. तसेच लोकसभेत ४२ पेक्षा जास्त जागा महाविकास आघाडी जिंकेल आणि २०० पेक्षा जास्त जागा विधानसभेत जिंकतील. असे मत त्यांनी मांडले. राज्याच्या राजकारणात ‘देशात नरेंद्र अन् राज्यात देवेंद्र’ अशी जाहिरात आपल्याला सतत पाहायला मिळली आहे. मात्र अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून वृत्तपत्रात छापून आलेल्या एका जाहिरातीने राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. कारण ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहिरात शिवसेनेकडून करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील 26.1 टक्के जनतेला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हवे आहेत, असा दावा नुकताच एका सर्वेमधून करण्यात आला. याच सर्वेमध्ये फडणवीसांना पसंती देणाऱ्यांची संख्या 23.02 टक्के होती. म्हणजेच शिंदेंपेक्षा जवळपास तीन टक्क्यांनी कमी मतं होती. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरच आजची जाहिरात देण्यात आली आहे का, असा सवाल देखील विचारला जात आहे.

हे ही वाचा:

शिवसेनेकडून जाहिरातबाजी : कोणता नेता आहे अधिक लोकप्रिय ?

Aryan khan ड्रग्ज प्रकरणाला नवे वळण, समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version