मुंबई आणि महाराष्ट्राला काय मिळालं?, अर्थसंकल्प सादरीकरणावर संजय राऊतांची टीका

मुंबई आणि महाराष्ट्राला काय मिळालं?, अर्थसंकल्प सादरीकरणावर संजय राऊतांची टीका

बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी बुधवारी देशाचा २०२३ – २४ चा अर्थसंकल्प (Budget) सादर केला. या अर्थसंकल्पावर महाराष्ट्रातील विरोधीपक्षातील अनेक नेत्यांकडून विरोध करण्यात आला. तर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षातील नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळेस संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत हे अर्थसंकप्लवर म्हणाले की “राऊत म्हणाले, “मुंबईसह महाराष्ट्रातून सर्वाधिक महसूल देशाला मिळत असून, त्यातूनच अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्या मुंबई आणि महाराष्ट्राला काय मिळालं? ” असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.

शिवसेना ठाकरे गाटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळेस त्यांनी केंद्राकडून सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पातून मुंबई आणि महाराष्ट्राला काहीच मिळाले नाही आहे. असे म्हणत भाजपवर आरोप केला आहे. दरम्यान संजयर राऊत म्हणाले की “मुंबईसह महाराष्ट्रातून सर्वाधिक महसूल देशाला मिळत असून, त्यातूनच अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्या मुंबई आणि महाराष्ट्राला काय मिळालं? तर अर्थसंकल्पाआधी अर्थखात्यात दक्षिण ब्लॉगला बंद खोलीत हलवा करतात. तो चमचाभर हलवा सुद्धा मुंबईच्या हातावर मिळाला नाही,”असे म्हणत अर्थसंकल्पाच्या विषयाचा आधार घेत संजय राऊत यांनी भाजपवर खोचक टीका केली आहे.

संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावरही भाष्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात संजय राऊत यांनी सांगितल की “पंतप्रधान एका महिन्यात दोनदा मुंबईत येत आहेत. मात्र, येताना मुंबईसाठी काय आणत आणि देत आहेत. हा रहस्यमय विषय आहे”. असे म्हणत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे.

हे ही वाचा:

आग्र्यामध्ये शिवजयंती साजरी करण्यासाठी परवानगी नाकारली, पुरातत्व खात्याविरोधात शिवप्रीमींनी दिल्ली हायकोर्टात केली याचिका

प्राप्तिकराच्या सवलतीचे गाजर आणि, अर्थसंकल्पावर सामनातून भाजपवर हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version