“मंत्रीपदाला काय करता.. मी स्वत: ला मुख्यमंत्री समजतो”; शिंदे गटातील ‘या’ आमदाराचे वक्तव्य

मंत्रीपद मिळाले नाही म्हणून शिंदे गटातील अनेक आमदार नाराज असल्याची चर्चा अनेक दिवस मोठ्या प्रमाणत रंगात होती. याच पार्शवभूमीवर शिंदे गटाचे आमदार किशोर आप्पा पाटील (Kishor Appa Patil) यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.

“मंत्रीपदाला काय करता.. मी स्वत: ला मुख्यमंत्री समजतो”; शिंदे गटातील ‘या’ आमदाराचे वक्तव्य

मंत्रीपद मिळाले नाही म्हणून शिंदे गटातील अनेक आमदार नाराज असल्याची चर्चा अनेक दिवस मोठ्या प्रमाणत रंगात होती. याच पार्शवभूमीवर शिंदे गटाचे आमदार किशोर आप्पा पाटील (Kishor Appa Patil) यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले आहेत की, “मी कधीही नाराज नसल्याचं त्यांनी सांगितलं. मंत्रीपदाला काय करता… मी स्वत: ला मुख्यमंत्री समजतो, असं वक्तव्यआमदार किशोर पाटील यांनी केलं आहे.

शिंदे सरकारला १०० दिवस पूर्ण झालं, त्यावर आमदार किशोर पाटील हे बोलत होते. “अडीच वर्षात जेवढ काम झालं नाही, तेवढ काम १०० दिवसांत भाजप आणि शिंदे गटाच्या युतीतील सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. राज्याच्या विकासाचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. १०० दिवसातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला कारभार म्हणजे, नायक या हिंदी चित्रपटाचा प्रत्यय येतो. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आमदार किशोर पाटील यांनी नायक चित्रपटाच्या अभिनेत्याची थेट उपाधी देऊन टाकली आहे, तर दुसरीकडे अडीच वर्षात त्यांना जे जमलं नाही, ते आमच्या सरकारनं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडवणीस यांनी करुन दाखवलं.”, असा टोलाही आमदार किशोर पाटील यांनी उध्दव ठाकरेंना लगावला आहे.

मंत्री पद न मिळाल्यानं नाराजी असल्याची चर्चा असून यावर आमदार किशोर पाटील यांना विचारलं असता, “मी कधीही नाराज नसल्याचं त्यांनी सांगितलं. मंत्रीपदाला काय करता… मी स्वत: ला मुख्यमंत्री समजतो, असंही आमदार किशोर पाटील स्पष्ट केलं आहे. मी निश्चितपणे मंत्रीपदासाठी शर्यतीत आहे. मंत्रीपदाची संधी मिळाली तर त्याचं सोन करेन, जे खातं मिळेल, त्या माध्यमातून राज्याच्या हिताचे निर्णय घेईन, असंही आमदार किशोर पाटील म्हणाले. एकीकडे नाराज नसल्याचं आमदार किशोर पाटील सांगतात, तर दुसरीकडे मंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचं सांगत मंत्रीपदाची अपेक्षाही व्यक्त करतात.

१०० दिवसांत सरकारनं शेतकरी असो इतर असे राज्याच्या विकासासासाठीचे महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितलं. इंधनदरवाढीवरुन आम्ही नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारविरोधात बोंबा मारायचो. मात्र सरकारनं कधी त्यांचा वाटा उचलला नाही, आमच्या सरकारनं सत्ता स्थापन होताच, सर्वात आधी इंधनदरवाढ कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे आमदार किशोर पाटील म्हणाले. दिवाळी पॅकेटच्या माध्यमातून गोरगरीबांची दिवाळी गोड करण्याचंही कामही या सरकारनं केलं असल्याचं आमदार किशोर पाटील म्हणाले.

शिंदे गटाचे आमदार हे सातत्यानं उध्दव ठाकरेंवर टीका करत असतात. आमदार किशोर पाटील यांनीही उध्दव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. उद्धव ठाकरेंचा आगामी काळात महाविकास आघाडीसोबत निवडणुका लढण्याचा निर्णय शिवसेनेला अधोगतीकडे नेणारा आहे, असं मत आमदार किशोर पाटील म्हणाले. पुढच्याला ठेच लागली की, मागचा शहाणा होतो. मात्र त्यांना ठेचांवर ठेचा लागताहेत, तरी हे शहाणे होणार नसतील, तर परमेश्वर यांचं भलं करो, अशीही टीका आमदार किशोर पाटील यांनी उध्दव ठाकरेंवर केली आहे.

हे ही वाचा:

मुंबईकरांच्या चिंतेत वाढ :मागील दहा वर्षात गंभीर गुन्हे ११२ टाक्यांनी वाढले.

Jai Jai Maharashtra Mazha : ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा…’, गीताला राज्यगीताचा दर्जा मिळणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version