भाजपने गुप्तपणे नेमकं काय सांगितलं? हे प्रत्येकवेळी आपल्याला समजतच असं नाही, राऊतांची टीका

काँग्रेस एकनिष्ठ आहे पण तांबेना भाजपने गुप्तपणे नेमकं काय सांगितलं ? हे प्रत्येकवेळी आपल्याला समजतच असं नाही, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.

भाजपने गुप्तपणे नेमकं काय सांगितलं? हे प्रत्येकवेळी आपल्याला समजतच असं नाही, राऊतांची टीका

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी मीडियाशी साधलेल्या संवादामध्ये अनेक गोष्टींवर आपलं मत व्यक्त केलं. यावेळी त्यांनी पदवीधर मदतदारसंघाच्या निवडणुकीच्या नाशिक विभागात अर्ज भरताना झालेल्या राजकीय ट्विस्ट बदल देखील भाष्य केलं. जो गोंधळ झाला त्याला तांबे स्वतः जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्याचवेळी त्यांनी भाजपाला देखील टोला लगावला आहे. यावेळी ते म्हणाले,काँग्रेस एकनिष्ठ आहे पण तांबेना भाजपने गुप्तपणे नेमकं काय सांगितलं ? हे प्रत्येकवेळी आपल्याला समजतच असं नाही, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली. तसेच थोड्याच वेळात ठाकरे गटाची मातोश्रीवर बैठक होणार असल्याची देखील त्यांनी माहिती दिली.

खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटलं,”महाविकास आघाडीचं सरकार एका कॉमन मिनिमम प्रोग्रामवर समन्वय राखून चालविले जात होतं. तसेच विरोधी पक्षात असताना देखील हाच संयम असावी हीच अपेक्षा आहे”, असं त्यांनी म्हटलं. त्याचबरोबर त्यांनी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये झालेल्या गोधळावर देखील भाष्य केलं. यावेळी ते म्हणाले,”विधानपरिषद निवडणुकीत गोंधळ झाला हे मान्य आहे ते नाकारू शकतच नाही. काँग्रेसकडून गोंधळ झाला असेल तरी महाविकास आघाडी म्हणून ते मान्य आहे. काँग्रेसकडून समानव्य राखून उमेदवाराची निवड झाली नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यापुढे त्यांनी म्हटलं,”नाशिकमध्ये जो गोंधळ झाला त्याला कोणालाही जबाबदार धरण्यात येणार नाही. जे झालं त्याला तांबे स्वःता जबादार आहेत. तांबे काँग्रेससोबत एकनिष्ठ असताना भाजपने त्यांना गुप्तपणे काय सांगितलं? हे प्रत्येकवेळी आपल्याला सांगता येईलच असं नाही,” असं म्हणत त्यांनी भाजपाला टोला लगावला. तसेच, नाशिकमध्ये सध्या फक्त सत्यजित तांबेनी अपक्ष अर्ज भरला असून भाजपने उमेदवार दिला नाहीये. त्यामुळे नाशिकमध्ये बिनविरोध निवणूक होईल अशा चर्चा आहे. यावर त्यांनी,”नाशिकमधील निवडणूक बिनविरोध होणार नाही”, असं स्पष्ट केलं

याबरोबरच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद येत आहे, असं देखील म्हटलं. त्यानंतर त्यांनी जम्मूमधून भारत जोडो यात्रेत सामील होणार असल्याचं देखील सांगितलं.

Exit mobile version