Cabinet Meeting : मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले?,वाचा सविस्तर

Cabinet Meeting : मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले?,वाचा सविस्तर

राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार गणेशोत्सव व नवरात्री प्रमाणे दिवाळीही जनतेची गोड असणार आहे याकरिता राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत त्याचप्रमाणे परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या शेतीचे नुकसान याची दखल घेत तातडीने पंचनामे करत शेतकऱ्यांना मदत द्यावी असे निर्देशही आजच्या बैठकीत देण्यात आले. जाणून घ्या सविस्तर…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने सर्वसामान्य जनतेची दिवाळी गोड व्हावी याकरिता स्वस्त धान्य दुकानात १०० रुपयांत चार वस्तु देण्याचा निर्णय घेतला होता. त्यात एक लिटर तेल, एक किलो रवा, साखर आणि चणाडाळ देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. स्वस्त धान्य दुकानात सामान्य नागरिक जाऊन सरकारने घोषणा केलेल्या वस्तु आल्यात का ? असे विचारत आहे. त्यात अद्यापही या वस्तु न आल्याचे कळताच नागरिक नाराजी व्यक्त केली जात होती परंतु आजच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार याची अंमलबजावणी येत्या काही दिवसात केली जाईल. स्वस्त धान्य दुकानदारांनाही याबबात सर्वप्रथम कल्पना देण्यात येईल. शिंदे सरकारने सामान्य नागरिकांसाठी घेतलेला निर्णय कागदावरच असल्याची चर्चा सुरू झाली होती मात्र आता सरकारच्या आदेशानुसार नागरिकांची दिवाळी नक्कीच गोड होईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

ठाण्यात सभा लावा, मी आलोच…  उद्धव ठाकरेंचं वक्तव्य

याच प्रमाणे परतीच्या पावसाने शेतीचं मोठं नुकसान झालंय. उभी पिकं पाणी पाण्याखाली गेली आहेत. हाता तोंडाशी आलेला घास मातीमोल झाला. काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. अशात सरकारी मदत कधी केली जाणार याबाबत सातत्याने प्रश्न विचारले जात होते.त्याचं उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. त्यांनी कर्जमाफीची घोषणा केली आहे. भूविकास बॅकेतून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे. ९६४ कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आली आहे, अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

परतीच्या पावसाने झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तातडीने हे सगळे पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत. शिंदे सरकार स्थापनेपासूनच शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करत आहे. आम्ही अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेतले. आताही आम्ही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करत आहोत, असं म्हणत शिंदे यांनी कर्जमाफीबाबत माहिती दिली.

लोकसभा निवडणुकीसाठी मनसे ॲक्टिव, आता बारामती मतदार संघासाठी कंबर कसली

शेतकऱ्यांनी खचू नये. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभं आहे. मदतीसाठी सरकार तयार आहे, असंही शिंदे म्हणालेत.

Exit mobile version