spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दसरा मेळावा घेऊन बोलण्यासारखं आता उरले तरी काय , नारायण राणे यांचा ठाकरेंना खोचला टोला

भाजपचे नेते निलेश राणे यांच्यावतीने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी विशेष 'मोदी एक्स्प्रेस' सोडण्यात आली. यावेळी निलेश राणे यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील उपस्थित होते.

भाजपचे नेते निलेश राणे यांच्यावतीने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी विशेष ‘मोदी एक्स्प्रेस’ सोडण्यात आली. यावेळी निलेश राणे यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील उपस्थित होते. पत्रकारांशी संवाद साधताना नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लबोलच केला आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Cheif Uddhav Thackeray) यांचे अस्तित्व उरलेले नाही. दसरा मेळावा घेऊन बोलण्यासारखं आता त्यांच्याकडे आता उरले तरी काय, असा खोचक टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला. ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना संपली असून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीच शिवसेना खरी असल्याचा निर्वाळाही राणे यांनी यावेळी दिला.

पुढे राणे म्हणाले, शिवसेनेकडे आमदार राहिलेच नाही. शिवसेनेतील ४० पेक्षा जास्त आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आहेत. तर, उरलेले काहीजण शिंदे यांच्याकडे जाण्याच्या तयारीत असल्याचेही राणे यांनी म्हटले. घरात बसून मुख्यमंत्रीपद हाताळता येत नसल्याचे देखील नारायण राणे यांनी म्हटले आहेत. अडीच वर्षाच्या काळात राज्य सरकार १० वर्ष मागे गेले. आता गणरायाच्या कृपेने मागील सरकार गेले आणि नवीन सरकार आले असल्याचे राणे यांनी म्हटले. महाराष्ट्रामध्ये भाजपची केंद्रात राज्यात सत्ता आहे. त्यामुळे आता राज्याचा सर्वांगीण विकास होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेचे अस्तित्व उरलं नाही. शिवाजी पार्कवर आता बोलण्यासारखं राहिलं काय असा खोचक प्रश्न त्यांनी केला. शिवसेनेची खरी गद्दारी उद्धव ठाकरे यांनी केली असल्याचे नारायण राणे यांनी म्हटले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद हे गद्दारी करून मिळवलं असल्याचा हल्लाबोल राणे यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत, एकनाथ शिंदे यांच्यासोबत गद्दारी करून मुख्यमंत्रीपद मिळवलं असल्याचे राणे यांनी म्हटले.

हे ही वाचा :- 

चंद्रशेखर बावनकुळे राज ठाकरेंच्या भेटीस शिवतीर्थावर, भाजप आणि मनसेच्या सततच्या भेटीमागचं रहस्य काय ?

शिंदे गटांकडून बीएमसी निवडणुकीसाठी नवीन शिलेदारांची निवड

शिवाजीपार्कमधील दसऱ्या मेळाव्याच्या मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंनी सोडले मौन म्हणाले…

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss