काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत राहुल गांधी कितव्या क्रमांकावर? कोणाचं सहकार्य तर, काहींचा विरोध

काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत राहुल गांधी कितव्या क्रमांकावर? कोणाचं सहकार्य तर, काहींचा विरोध

आगामी लोकसभा २०२४ निवडणुकीच्या तयारीत काँग्रेस पक्ष व्यस्त आहे. संघटनेला जीवदान मिळावे या आशेने पक्षाची ‘भारत जोडो यात्रा’ यात्रा सुरू आहे. पीएम मोदींचे झंझावात आणि केजरीवाल यांची वाढती पावले यांच्यात काँग्रेस सतत आपली राजकीय जमीन मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. या सर्व परिस्थितीत पक्षाला अद्याप पूर्णवेळ अध्यक्ष निवडता आलेली नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून अध्यक्षपदाचा शोध सुरू आहे. काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार? यावर अजूनही सस्पेन्स कायम राहील आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीतील मोठ्या पराभवानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि तेव्हापासून सोनिया गांधी पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. काँग्रेस अध्यक्षपदासाठी २४ ते ३० सप्टेंबर दरम्यान नामांकन प्रक्रिया पार पडणार आहे.

हेही वाचा : 

मुख्यमंत्र्यांच्या ‘या’ निर्ययामुळे, गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचा शिवप्रेमीचा मोर्चा थंडावला

काँग्रेस पक्षाचा पुढील प्रमुख कोण होणार? याची जबाबदारी राहुल गांधी किंवा या कुटुंबाव्यतिरिक्त कोणी घेणार का? या प्रकरणाबाबत अद्यापही राजकीय वर्तुळात याबाबत चर्चा सुरू आहे. काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांना राहुल गांधी अध्यक्ष व्हावेत, तर पक्षातील काही नेत्यांना गांधी कुटुंबाव्यतिरिक्त कोणीतरी अध्यक्ष व्हावे, असे वाटते. राहुल गांधी यांनी याआधीही एकदा म्हटले आहे की, अध्यक्ष हा गांधी कुटुंबाबाहेरील कोणीतरी असेल. शनिवारी राजस्थान काँग्रेसने राहुल गांधींना अध्यक्ष करण्याचा ठराव मंजूर केला असला तरी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पुढाकार घेतला.

राहुल गांधींच्या समर्थनाला कोणाचा पाठिंबा ?

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत अध्यक्ष होणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे, मात्र राहुल गांधी अध्यक्ष व्हावेत, अशी त्यांची इच्छा आहे. त्याचबरोबर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाची कमान राहुल गांधी यांच्याकडे असायला हवी असे मत व्यक्त केले आहे. मल्लिकार्जुन खर्गे, अजय माकन, पीसीसी प्रमुख गोविंद सिंग दोतासरा यांच्यासह अनेक नेते राहुल गांधींच्या समर्थनार्थ उभे आहेत. जयराम रमेशही राहुलच्या समर्थनात आहेत, पण गांधी घराण्याव्यतिरिक्त कोणी अध्यक्ष झाले तरी संघटनेशी संबंधित बाबींमध्ये नेहरू-गांधी घराण्याचे महत्त्व अबाधित राहील, असे त्यांचे म्हणणे आहे. रणदीप सिंग सुरजेवाला म्हणतात की, राहुल गांधी हे भाजपविरोधात निर्भय आवाज आहेत.

Adipurush : प्रभास आणि क्रिती सॅनन पडले प्रेमात?,आदिपुरुषच्या सेटवर वाढली जवळीक

राहुल गांधींच्या विरोधात कोण?

अशोक गेहलोत यांना काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिल्यास पक्षाचे खासदार शशी थरूरही आपला दावा मांडू शकतात. शशी थरूर यांच्यासह पक्षाच्या अनेक नेत्यांनी वारंवार असे म्हटले आहे की, काँग्रेस अध्यक्षपदासाठी लोकशाही पद्धतीने होणारी लढत पक्षाला नवी आशा आणि जीवन देईल.

जास्त लोक निवडणूक लढतील, हे पक्षाच्या हिताचे असेल, असे अनेक नेत्यांचे मत आहे. थरूर यांच्यासह अनेक नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. थरूर यांच्याशिवाय मनीष तिवारी, कार्ती चिदंबरम यांच्यासह अनेक नेत्यांनी नामांकन प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी संभाव्य उमेदवारांना काँग्रेस कमिटीच्या इलेक्टोरल कॉलेजची यादी द्यावी, असे म्हटले होते.

फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सेफ अली खानने उडवली ‘या’ अभिनेत्याची खल्ली

 

Exit mobile version