अण्णा हजारे यांचं दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्या मागचे कारण काय?

अण्णा हजारे यांचं दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्या मागचे कारण काय?

प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिले आहे. दिल्लीतील दारूची दुकाने बंद करावीत, असे हजारे यांनी पत्रात म्हटले आहे. केजरीवाल मुख्यमंत्री झाल्यानंतर लोकपाल आणि लोकायुक्त यांचा विसर पडल्याचे ते म्हणाले. केजरीवाल मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांना पत्र पाठविले आहे. यात त्यांनी केजरीवाल यांच्यावर थेट टीका करत, “तुम्ही सत्ता व सत्तेतून पैसा या दुष्टचक्रात अडकलेले दिसतात”, असेही त्यांनी म्हटले.

हेही वाचा : 

जम्मू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘राख’ चित्रपटातील भूमिकेसाठी संदीप पाठक सन्मानित

या पत्राद्वारे अण्णा हजारे म्हणाले की, तुमच्या सरकारने महिलांवर परिणाम करणारे दारू धोरण केलं, लोकांचं जीवन उद्ध्वस्त केलं. तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक आहे. अण्णांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे की, टीम अण्णाच्या सदस्यांची १० वर्षांपूर्वी १८ सप्टेंबर २०१२ रोजी दिल्लीत बैठक झाली, त्यावेळी तुम्ही राजकीय मार्ग स्वीकारण्याबाबत बोलले होते. पण राजकीय पक्ष काढणे हे आमच्या आंदोलनाचं उद्दिष्ट नव्हतं हे तुम्ही विसरलात. आदर्श राजकारण आणि व्यवस्थेचे विचार मांडले. पण दिल्लीचे मुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्ही लोकपाल आणि लोकायुक्त कायदा विसरलात. तुमच्या सरकारने महिलांवर परिणाम करणारे, लोकांचे जीवन उद्ध्वस्त करणारे दारू धोरण केले. यावरून तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात तफावत असल्याचे दिसून येते. अशी टीका अण्णा हजारे यांनी केली.

चंद्रशेखर बावनकुळे राज ठाकरेंच्या भेटीस शिवतीर्थावर, भाजप आणि मनसेच्या सततच्या भेटीमागचं रहस्य काय ?

Exit mobile version