spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सत्तेसाठी बाप बदलणाऱ्यांना काय म्हणावं? सुषमा अंधारेंची नवनीत राणांवर टीका

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे.

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. सत्ताधारी आणि राजकीय पक्षांमध्ये मागील काही दिवसांपासून अनेक आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. अश्यातच आज ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अमरावती मधील सभेत नवनीत राणा यांची नक्कल करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यात सगळीकडे अनेक चर्चा रंगल्या आहेत. २०१४ ला जी माऊली उभी राहिली ती म्हणाली होती पवार साहेब माझे वडील आहेत. आता अमित शाह यांच्यासाठी पितृतुल्य झाले आहेत. सत्तेसाठी बाप बदलणारे असतील तर याला काय म्हणावं? महाराष्ट्र गद्दारांना थारा देत नाही.महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवला जातो. आम्ही वारंवार प्रश्न विचारत राहणार आहोत, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या, नवनीत आक्कावर हल्ला करणारा आमचा शिवसैनिक सुद्धा मंचावर आहे. दोन दिवसांआधी प्रसार माध्यमांमध्ये एक लाईन सुरु होती. महाविकास आघाडीमध्ये अलबेल आहे का? इकडे सगळं अलबेल आहे. जिथं अलबेल नाही तिथल्या बातम्याकडे लक्ष द्यावे,अशी मी अपेक्षा करते. जर मला जात चोरता आली असती तर मला कदाचित अमरावती निवडणूक लढवता आली असती. एक दिन मे रश्मी बर्वेच जात प्रमाणपत्र रद्द होते आणि पाच वर्षांपासून नवनीत राणा यांचा निकाल का लागत नाही? निकाल काय लागणार हे माहीत आहे का? गणेश विसर्जन कसं करतात हे तरी कळतं का? असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

उदयनराजे यांना ४ दिवस वेटिंग वर ठेवण्यात आले. एका रात्रीमध्ये नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली. लगेच एकाच दिवशी त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली. देवा भाऊ नवनीत राणाचं वजन तुमच्यापेक्षा जास्त होत आहे का? ही निवडणूक लोकांनी आपल्या हातात घेतली आहे. त्यांना सगळं माहीत आहे की काय घडलं.जेवढा मोठा घोटाळा तेवढं मोठं पद हीच मोदींची गॅरेंटी आहे. संविधान धोक्यात आलं आहे. या संविधान लोकांना बदलायचं आहे. ज्या बाईने हनुमान चालीसा वर वादंग केलं त्यांना अजूनही हनुमान चालीसा म्हणता येत नाहीये, असे सुषमा अंधारे म्हणाल्या. भाजपच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा घडत आहे, इथले भाजपचे लोक ही नवनीत राणाला मतदान करणार नाहीत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कापसाला ११ हजार रुपये इतका दर मिळाला होता. आज कापसाला ६ हजारापेक्षा कमी दर मिळत आहे. अमरावतीच्या उमेदवाराला निवडून द्या. तुम्ही भावनिक होऊ नका, असे आव्हान देखील सुषमा अंधारे यांनी केलं आहे.

हे ही वाचा:

कर्णधार हार्दिक पांड्याला चाहत्यांनी केले ट्रोल, पोस्ट शेअर करत सोनू सूदने दिली प्रतिक्रिया

लहान मुलांच्या आहारात ‘या’ पदार्थाचा समावेश केल्याने शरीराला होतात फायदे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss