नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्री सर्वेक्षणात काय होते Udhav Thakare यांचे निष्कर्ष ?

नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्री सर्वेक्षणात काय होते Udhav Thakare यांचे निष्कर्ष ?

नुकतेच महाराष्ट्र राज्याचे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री कोण? हे सर्वेक्षण पार पडले. या सर्वेक्षणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना लोकप्रिय मंत्री म्हणून सर्वात जास्त पसंती मिळाली. परंतु याच गोष्टी वरून राजकीय वातावरणात वेगवेगळे पडसाद उमटले. लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या या सर्वेक्षणात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thakare) यांचे सुद्धा नाव होते. यामधून मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांची कामगिरी कशी होती? याचा शोध घेण्यात आला आहे. यासंदर्भात निष्कर्ष समोर आले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या या सर्वेक्षणात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचं काम अधिक चांगलं होतं, असं महाराष्ट्रातील २१ टक्के लोकांचं मत आहे. तसेच, २७ टक्के लोकांनी ठाकरे यांचं काम समाधानकारक असल्याचं म्हटलं आहे. तर ४५ टक्के लोकांना उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून कामगिरी आवडली नाही आणि त्यांनी त्यांना वाईट म्हटलं आहे. उर्वरित सात टक्के लोकांनी ‘माहित नाही’ असं उत्तर दिलं आहे.

नोव्हेंबर २०१९ मध्ये शिवसेना (Shiv Sena UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्या कार्यकाळात त्यांच्यासमोर अनेक आव्हानं होती. त्यानंतर कर्जमाफी, पायाभूत सुविधांची कोंडी, बेरोजगारी, अर्थव्यवस्थेचं व्यवस्थापन असे अनेक मोठे प्रश्न उद्धव ठाकरेंसमोर होते. दोन वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ३० जून २०२२ रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. महाराष्ट्रात लवकरच विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. या निवडणुकांसाठी एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे.

हे ही वाचा:

चक्क बॉलिवूड अभिनेत्री Shilpa Shetty च्या घरी चोरी, पोलिसांकडून दोघांना अटक!

Ajit Pawar यांनी शिंदे-फडणवीस सरकार खडेबोल सुनावले

बिपरजॉय चक्रीवादळाचा लांबपल्याच्या गाड्यांवर मोठा परिणाम, पश्चिमी रेल्वेकडून नवीन अपडेट जारी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version