spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

“ज्याला आपण मतदारांशी प्रतारणा करणं असं म्हणतो, तीच या महाराष्ट्रात झालीय”; Raj Thackeray यांचे भाष्य

सध्या राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक घडामोडीना वेग आला आहे. या निवडणुकीत आपली पोळी कशी भाजेल, लोकांच्या मनात स्थान कसे निर्माण होईल व अत्यधिक मते कशी प्राप्त होतील या दिशेने चोख काम पार पाडण्यासाठी सुरुवात केलेली दिसून येते. विधानसभा निवडणुकीचे राजकीय पक्षांना वेध लागलेले असताना सुद्धा प्रत्येक जण कंबर कसून कामाला लागलेले दिसून येतात. सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजत आहेत.अशातच सर्वच पक्षांनी आपाआपल्या परीनं निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. त्याचप्रमाणे मनसेसुद्धा कमला लागलेली दिसून येत आहे. आज (२४ ऑगस्ट) मनसेचे संस्थापक आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली या परिषदेत त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. सोबतच त्यांनी काही पत्रकारांना सुद्धा या परिषदेत चिमटे काढले. यात त्यांनी एक वक्तव्य केले ते म्हणजे -“लोकसभा निवडणुकीत महविकास आघाडीचा विजय झाला हा काही त्यांच्या प्रेम पोटी नव्हे तर महायुतीच्या विरोधात झाला.” जाणूयात ते नेमके काय म्हणाले..

राज ठाकरे नक्की काय म्हणाले ?

“लोकसभेच्या (Lok Sabha Election Results 2024) वेळी जे काही मतदान झालं ते आपण नीट समजून घेतलं पाहिजे. देशातील एकगठ्ठ मुस्लिम समाजाने मोदी-शहांविरोधात मतदान केलं. तसेच भाजपने दिलेल्या अबकी बार ४०० पारच्या नाऱ्यावरुन संविधान बदलणार, अशी वक्तव्य त्यांच्याच नेत्यांनी केली आणि त्यानंतर एक वेगळं वातावरण तयार झालं. त्यामुळे एकगठ्ठ दलित समाजानेही भाजप विरोधात मतदान केलं. अँटी मोदी, अँटी शहा प्रकारचे हे मतदान होतं. महाविकास आघाडीला झालेला मतदान हे काही शरद पवार (Sharad Pawar) किंवा उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) प्रेमापोटी झालेले मतदान नव्हतं. त्यामुळे ती जी वाफ होती ती लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस निघाली. आता विधानसभेच्या वेळेस जे काही राजकारण आणि एकंदरीत परिस्थिती निर्माण झाली आहे, ज्याला आपण गलिच्छ राजकारण म्हणू, या राजकारणाला लोक विसरलेले नाहीत. ज्याला आपण मतदारांशी प्रतारणा करणं असं म्हणतो, तीच या महाराष्ट्रात झालीय. अशी परिस्थिती गेल्या पन्नास वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत बघितली नाही. त्यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदार हा राग नक्कीच काढतील,” असा विश्वास मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर देखील निशाणा साधला. ते नागपूर येथे बोलत होते.

हे ही वाचा:

“इथे बहिणींवर अत्याचार होत आहेत आणि कंस मामा राख्या बांधत फिरत आहेत”; Uddhav Thackeray यांनी विरोधकांना काढला चिमटा

“Maharashtra Band हा बंद विकृती विरोधी संस्कृती असा आहे”; Uddhav Thackeray यांचे मंतव्य

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss