इतर राज्यांच्या निवडणुकीचा काय होणार महाराष्ट्रावर परिणाम

इतर राज्यांच्या निवडणुकीचा काय होणार महाराष्ट्रावर परिणाम

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांकडे लोकसभेची सेमी फायनल म्हणून बघितलं जात होतं. देशाचा मूड काय आहे हे कळायला मदत होईल या अपेक्षेने सर्व पक्ष आणि कार्यकर्ते या निवडणुकांकडे बघत होते. काल चार राज्यांचा निकाल लागला तर आज एका राज्याचा निकाल लागला. हिंदी पट्ट्यातील तीन राज्यात मोदी लाट कायम असल्याचं पक्कं झालं. या पाच राज्यांपैकी तेलंगणा आणि मिझोराममध्ये भाजपला गमावण्यासारखं काही नव्हतं. झाला तर फायदाच होणार होता. जो त्यांना झाला.. दोन्ही राज्यात त्यांनी आपली कामगिरी सुधारली. तेलंगणामध्ये केसीआर यांना हरवत काँग्रेसनं सत्ता मिळवली. तिथे भाजपनेही राज्य स्थापन झाल्यापासून सर्वात जास्त १४ टक्के मतं मिळवत आठ जागा जिंकल्या. मिझोराममध्ये ५ टक्के मतं मिळवत २ जागा जिंकल्या.

पण भाजपचं सारं लक्ष राजस्थान, छत्तीसगड परत मिळवणं आणि त्याही पेक्षा जास्त लक्ष मध्यप्रदेश कायम राखण्याकडे होतं. 2018 पर्यंत या तिन्ही राज्यात भाजप सलग तीन तीन टर्म जिंकली होती पण त्या काळातल्या रमण सिंह, वसुंधरा राजे सिंधिया अशा मोठ्या नेत्यांवर अवलंबून न राहता भाजपने नवी टीम बांधण्यावरही भर दिला. भाजपच्या एकखांबी तंबुया उलट काँग्रेसचा प्रचार मोदींभोवती जास्त काळ फिरता राहिला, मोदींवर टीका टीपण्णी करण्याच्या नादात, एन्टी कॅनवासिंगच्या नादात, मोदीविरोधी नॅरेटीव्ह सेट करण्याच्या नादात, आपली कामं, आपल्या स्ट्रेंग्थ मतदारांपर्यंत पोहोचवण्यात काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस नेते या तीन राज्यात कमी पडले असं म्हणायला आता वाव आहे. त्यामुळे तीन राज्यातील मतदारांनी मोदींवर आणि भाजपवर पुन्हा विश्वास टाकला. चार महिन्यावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणूकीत मोदी लाट थोपवण्याचं काँग्रेस आणि मित्रपक्षांसमोरचं मोठं आव्हान आणखी कठीण झालं आहे. आपापसातले मतभेद दूर सारुन ते कशी रणनीती आखतात यावर ती लढत अटतटीची होणार की मोदी सहज विजयाची हॅटट्रिक साजरी करणार हे ठरेल.

मध्यप्रदेशात २००३ ते २०१८अशी सलग १५ वर्ष शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री होते, २०१८साली सत्ता गेली पण वर्ष दीडवर्षात ऑपरेशन लोटस यशस्वी झालं आणि पुन्हा सीएमपदासाठी मोदीशाहांनी शिवराजमामांवरच विश्वास टाकला. मात्र आता बहुमत मिळाल्यावर शिवराजमामाच मुख्यमंत्री बनतील की एखादा नवा चेहरा दिला जाईल याची जोरदार चर्चा तिथे सुरु आहे. शेजारच्या छत्तीसगडमध्ये सुद्धा२००३ ते २०१८ अशी सलगचा संपू

हे ही वाचा:

KBC च्या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी सून ऐश्वर्याचं केलं कौतुक

Politics: राष्ट्रवादी पक्ष पवार साहेबांमुळेच वाढला, जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट चर्चेत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version