काय असेल शरद पवार गटाच्या नव्या राजकीय पक्षाच नाव? सूर्यफूल, उगवता सूर्य…

आता शरद पवार यांच्या गटासमोर अनेक पेच उभे राहिले आहेत. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला आज दुपारपर्यंत पक्षासाठी नवीन नाव आणि चिन्ह सुचवायला सांगितलं आहे.

काय असेल शरद पवार गटाच्या नव्या राजकीय पक्षाच नाव? सूर्यफूल, उगवता सूर्य…

NCP Crisis Latest Update : काल दिनांक ६ फेब्रुवारी २०२४ रोजी महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठी घडामोड ही घडली आहे. केंद्रीय निवडणूक योगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर निकाल जाहीर करण्यात आला. निवडणूक आयोगाने याबाबत अतिशय मोठा आणि ऐतिहासिक असा निर्णय दिला आहे. या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचा मोठा पराभव झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह देण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर हक्क कुणाचा? यासाठी दोन्ही गटांनी निवडणूक आयोगात धाव घेतली होती. बरेच महिने सुनावणी चालली. अखेर निवडणूक आयोगाने विधिमंडळातील संख्याबळ पाहता अजित पवारांच्या बाजूने निर्णय दिला. त्यामुळे अजित पवार गटासाठी हा सर्वात मोठा दिलासा आहे. परंतु आता शरद पवार यांच्या गटासमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.

तर आता शरद पवार यांच्या गटासमोर अनेक पेच उभे राहिले आहेत. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला आज दुपारपर्यंत पक्षासाठी नवीन नाव आणि चिन्ह सुचवायला सांगितलं आहे. शरद पवार गटाला दुपारपर्यंत पक्षासाठी नवीन नाव आणि चिन्ह काय असेल? त्या बाबत कळवाव लागणार आहे. त्यामुळे नवीन नाव आणि चिन्ह नेमकं काय असणार याकडे सर्वांचं लक्ष हे लागले आहे.

शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून नवे नाव, चिन्हासाठी चाचपणी सुरु झाली आहे. निवडणूक आयोगाने पक्षाचं चिन्ह (Symbol) आणि पक्ष (Party) अजित पवारांकडे (Ajit Pawar) सोपवल्यावर आता शरद पवार गटाकडून नव्या नावांचा (New Party Name) विचार सुरू आहे. नव्या पक्षासाठी शरद पवार काँग्रेस, मी राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी स्वाभिमानी पक्ष या नावांचा विचार आणि चर्चा सुरु आहे. तर चिन्हांसाठी कपबशी, सूर्यफूल, चष्मा, उगवता सूर्य या चिन्हांचा विचार सुरु आहे. काही वेळात या संदर्भात निर्णय समोर येईल.

हे ही वाचा:

मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावर संसदेत लक्ष वेधले, सुप्रिया सुळे

व्हॅलेंटाईन डे निमित्त करण जोहरची ‘लव्ह स्टोरीज’ सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version